Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

रिलायन्स फाउंडेशन, इफको आणि कृषी विज्ञान केंद्र ,छत्रपती संभाजी नगर १ यांचे संयुक्त विद्यमाने माती परीक्षण कार्यशाळा संपन्न

रिलायन्स फाउंडेशन, इफको आणि कृषी विज्ञान केंद्र ,छत्रपती संभाजी नगर १ यांचे संयुक्त विद्यमाने माती परीक्षण कार्यशाळा संपन्न

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र):-तालुका पैठण येथे रिलायन्स फाउंडेशन,इफको आणि कृषी विज्ञान केंद्र ,छत्रपती संभाजी नगर १ यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी खेर्डा या गावी माती परीक्षण कार्यशाळा घेण्यात आली,या कार्यशाळेमध्ये सुरवातीला शेतकरी बांधवाना माती का तपासावी ,कशासाठी तपासावी आणि त्याचा शेतकरी बांधवाना काय फायदा आहे तसेच माती नमुना कसा घ्यायचा,शेतातील कुठल्या ठिकाणचा घ्यायचा त्याचे नियम काय आहे यावर सविस्तर मार्गदर्शन इफको चे मृदा चाचणी अधिकारी श्री.जगदीश देवतकर सर,प्रयोगशाळा सहाय्यक श्री,शिवकुमार पांडे यांनी उपस्थित शेतकऱयांना केले त्या नंतर शेतकरी बांधवांनी सांगितलेल्या नियमानुसार आपले आपले माती चे नमुने आणून दिले आणि एकूण ५० शेतकरी बांधवांचे त्याच दिवशी इफको चे प्रयोग शाळेमध्ये त्याच गावात जागेवर माती नमुने तपासून देण्यात आले,

इफको चे छत्रपती संभाजी नगरचे उप महाप्रबंधक एस.एन. कुलकर्णी साहेब यांनी कार्यशाळेला माती तपासणी प्रयोग शाळा उपलब्ध करून दिल्या बद्दल तसेच रिलायंस फाउंडेशन चे जिल्हा व्यवस्थापक नितीन कोल्हे व कार्यक्रम सहायक शांतीलाल राठोड यांचे कार्यक्रम आयोजित केले त्याबद्दल शेतकरी बांधवांनी इफको आणि रिलायंस फाउंडेशन चे आभार व्यक्त केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे