Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

रिलायन्स फाऊंडेशन कडून शेतकऱ्यांना माती परिक्षणासाठी नमुना निवडण्यासाठी प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन

रिलायन्स फाऊंडेशन कडून शेतकऱ्यांना माती परिक्षणासाठी नमुना निवडण्यासाठी प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन

अकोला :- कृषी विद्यापीठ अकोला, इफको आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यातील घुसर व चेलका येथे माती परीक्षण करण्याकरिता नमुना कसा निवडावा याविषयी प्रात्यक्षिक देण्यात आले.

या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांचे शेतीतील मातीचे नमुने इफकोच्या मार्फत मोफत तपासणी करून त्याची आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमामध्ये रिलायन्स फाउंडेशनचे विषय तज्ज्ञ श्री सचिन मातळे यांनी माती परीक्षण का करावे, त्याचा पिकाच्या उत्पादन वाढीमध्ये कसा फायदा होतो याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच कृषी सहाय्यक कु. आतांबर मॅडम व कृषी सहाय्यक कु. राऊत मॅडम तसेच श्री श्रीकांत सारप यांनी मातीचा नमुना कसा घ्यावा, नमुना कुठला घ्यावा, कुठला घेऊ नये याविषयी प्रात्यक्षिक देऊन सविस्तर माहिती दिली.
पीक उत्पादन वाढीकरिता जमिनीचे आरोग्य सुधारणे गरजेचे असून जमिनीचे सेंद्रिय कर्ब वाढीकरिता सेंद्रिय खतांचा वापर करावा. तसेच रासायनिक खताना संतुलित वापर करण्याचा सल्ला श्री सचिन मातळे यांनी दिला. तसेच रिलायन्स फाऊंडेशनच्या विविध सेवांविषयी रिलायन्स फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक यांनी माहिती दिली व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाविषयी कुठलीही समस्या असल्यास रिलायन्स फाऊंडेशनच्या टोल फ्री क्रमांक 18004198800 यावर संपर्क करण्याचे आव्हान केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे