Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

ममदापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त – व्याख्यान

ममदापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त – व्याख्यान

MB NEWS (सुनिल घोरमाडे )तिवसा:-
तालुक्यातील ममदापूर येथे उद्या ३१ मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.
यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे देशभरातील कार्य व त्यांच्या विचारवर प्रकाश टाकण्या करिता पुसद येथील सुप्रसिद्ध युवा व्याख्याते राज घुमणार यांच्या जाहीर व्याख्यानाचे भव्य आयोजन उदया सायंकाळी ७ ते १० यावेळेत गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.राजमातेची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करूया या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला विभागाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या सह आमदार बळवंत वानखडे उपस्थित राहणार आहे सोबतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवेक्ते दिलीप एडतकर,तिवसा पंचायत समितीच्या सभापती कल्पना दिवे उपसभापती रोशनी पूनसे उपस्थिती राहणार आहे.तर सदर कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे