Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

दसरा मेळाव्याला अद्याप परवानगी नाहीच, उद्धव ठाकरेंनी अजितदादांचा ‘तो’ सल्ला ऐकला?

Authored by रमेश खोकराळे | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 21, 2022, 10:37 AM

Maharashtra Politics| शिवसेनेची रिट याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती रमेश धनुका यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ किंवा न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे. थोड्याच वेळात खंडपीठासमोर जाऊन याचिकेची प्राथमिक माहिती देत सुनावणीसाठी तातडीची तारीख मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

 

Shivaji Park
दसरा मेळावा

हायलाइट्स:

  • येत्या ५ ऑक्टोबरला दसरा मेळावा
  • शिवसेनेच्या हातात अगदी थोडाचवेळ शिल्लक
मुंबई: दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अद्याप परवानगी न दिल्याने शिवसेनेच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेकडून थोड्याचवेळात दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या ५ ऑक्टोबरला दसरा मेळावा असल्याने शिवसेनेच्या हातात अगदी थोडाचवेळ शिल्लक आहे. त्यामुळे याचिका/अर्जाची प्राथमिक माहिती देऊन सुनावणीसाठी तातडीची तारीख देण्याची विनंती शिवसेनेतर्फे कोर्टाला केली जाऊ शकते.

मुंबई महापालिका, मुंबई महापालिका आयुक्त आणि जी-उत्तर वॉर्डचे सहायक आयुक्त यांच्याविरोधात शिवसेनेची रिट याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती रमेश धनुका यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ किंवा न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे. थोड्याच वेळात खंडपीठासमोर जाऊन याचिकेची प्राथमिक माहिती देत सुनावणीसाठी तातडीची तारीख मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे