Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील “गौरक्षण” मधील देव-गाईवर अंत्यसंस्कार व “भावपूर्ण श्रद्धांजली”

श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील “गौरक्षण” मधील देव-गाईवर अंत्यसंस्कार व “भावपूर्ण श्रद्धांजली”

MB NEWS (चांदुर रेल्वे) -अमरावती जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानचे “गौरक्षण” मधील देव-गाईला दि.१७/६/२०२४ सोमवारला देवाज्ञा झाली असून संस्थानचे वतीने या देव-गाईला दि.१८/६/२०२४ मंगळवारला सकाळी ८.०० वाजता खड्डा खोदून संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम वैतागराव नेमाडे यांचे हस्ते देव- गायीची पूजा करून संस्थानचे गलपामध्ये संपूर्ण विधिवत अंत्यविधी करून माती देण्यात आली.
या वेळी संस्थानचे विश्वस्त विनायकराव पाटील, फुलसिंगजी राठोड, चरणदासजी कांडलकर, लक्ष्मण राठोड, संस्थानचे कर्मचारी उत्तम चौधरी, प्रेमदास जाधव,रवी खत्री*, संस्थानचे गौरक्षण कर्मचारी सहारे,साहेबराव चौधरी*, जे.सी.बी.मालक शामभाऊ नांदुरकर आणि संचालक चमू व इतर गावकरी मंडळी यांची या अंत्यसंस्काराला प्रामुख्याने उपस्थिती होती, या वेळी महाराजांची आरती म्हणून “भावपूर्ण श्रद्धांजली” अर्पण करण्यात आली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे