Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

काँग्रेस नेता आणि कार्यकर्त्यांनी अमर काळे यांचे केले भव्य स्वागत. खासदारांचं आगमन तालुक्यात,तालुका राष्ट्रवादी नेत्याना नाही माहिती.

काँग्रेस नेता आणि कार्यकर्त्यांनी अमर काळे यांचे केले भव्य स्वागत. खासदारांचं आगमन तालुक्यात,तालुका राष्ट्रवादी नेत्याना नाही माहिती.

MB NEWS (अतुल उज्जेनकर) चांदुर रेल्वे :-लोकसभा निवडणूक जिंकल्या नंतर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांचे शनिवारी शहरात आगमन होताच. काँग्रेस नेता विरेंद्र जगताप आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. परंतु ह्या घटनेची माहिती, तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना नव्हती.पण काँग्रेस नेता आणि कार्यकर्त्यांना सर्व घटनाक्रम चांगल्या प्रकारे माहीत होता. ह्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते मंडळी नाराजगी दिसत आहे.

वर्धा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना (उ. बा.ठा.) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने गटाने युती करून सीटा लढवल्यामुळे विजय प्राप्त केला. निवडणूक जिंकल्यानंतर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे नव्याने निवडून आलेले खासदार अमर काळे हे शनिवारी पहिल्यांदा चांदुर रेल्वे मध्ये आले असता. काँग्रेस नेता वीरेंद्र जगताप आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. परंतु याची माहिती राष्ट्रवादीचे स्थानिक नेता आणि कार्यकर्त्यांना असल्यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले. आमच्या पक्षाचे खासदार इथे आल्यानंतर आम्हालाच माहिती नाही. हि गोष्ट आमच्यासाठी चांगली नाही. मित्र पक्षाच्या नेत्यांनी नवनिर्वाचित खासदार अमर काळे येत असल्याची माहिती आम्हाला द्यायला पाहिजे होती. परंतु इथे मित्र पक्षाच्या वतीने आघाडीचा नियम पाडल्या जात नाही. असेच होत राहिल्यास धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे नेता आणि कार्यकर्त्या त्यांच्याकडून मदत मिळण्याऐवजी नाराजीचे वातावरण निर्माण होईल. शरदचंद्र पवार गटामध्ये चालू आहे.

काँग्रेसने नव्याने निवडून आलेले खासदार अमर काळे यांचे भव्य स्वागत केले.
वर्धा लोकसभा मतदार संघाचे नव्याने निवडून आलेले खासदार अमर काळे यांचे चांदूर रेल्वेला शनिवारी आगमन होताच काँग्रेस कार्यकर्त्यां कडून विरूळ चौकात भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. हावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पुष्पहार गळ्यात घालून खासदारांचे स्वागत केले. यावेळी काँग्रेस नेता वीरेंद्र जगताप, तालुका अध्यक्ष अमोल होले, पूर्व अध्यक्ष शिट्टी सूर्यवंशी, राजू लांजेवार, संदीप शेंडे, गोपाल अविनाशे, सारंग देशमुख, सतीश देशमुख व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे