Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

लाडक्या बहिणीं’ना आता गॅस सिलिंडरही मिळणार मोफत; लवकरच अंमलबजावणी सुरु…

लाडक्या बहिणीं’ना आता गॅस सिलिंडरही मिळणार मोफत; लवकरच अंमलबजावणी सुरु…

माझी लाडकी बहीण योजनेबरोबरच महायुती सरकार महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट देणार आहे. राज्यातील लाडक्या बहि‍णींना आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याला १५०० रुपयांसह लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मिळणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून त्याचा शासकीय आदेश काढला जाणार असून अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्नगट आणि अत्यल्प उत्पन्न गट यांना तीन सिलिंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

 *तीन सिलेंडर मोफत कसे मिळणार?*
उज्ज्वला योजनेतील महिलांना केंद्र सरकार एका गॅस सिलेंडरमागे 300 रुपये अनुदान देते, एका गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत 830 रुपये धरुन प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर 530 रुपये याप्रमाणे तीन सिलेंडर मोफत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, व आता लवकरच त्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे.

 *कोणाला मिळणार लाभ?*
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना एका कटुंबात एका रेशनकार्डवर कितीही महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलिंडर दिला जाणार आहे. गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे