Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

जि.प. शाळा पळसखेड येथे रक्षाबंधनच्या मुहूर्तावर चिमुकल्याणी राबवली राखीची कार्यशाळा

जि.प. शाळा पळसखेड येथे रक्षाबंधनच्या मुहूर्तावर चिमुकल्याणी राबवली राखीची कार्यशाळा

MB NEWS( चांदुर रेल्वे ):- जि.प. प्राथमिक शाळा पळसखेड येथे बहीण भावाच्या प्रेमाच्या सणाबद्दल राखी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये वर्ग 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक अशा सुंदर राख्या बनवल्या होत्या. विद्यार्थ्यांतील सुप्त गुणास वाव मिळावा या दृष्टीने स्टॉल लावून राख्याची विक्री करण्यात आली. गावकरी मंडळींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेतील शिक्षक वृंद यांच्या अथक मार्गदर्शनामुळे तसेच विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेमुळे असेच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभल्यास भविष्यातील भारत हा स्वप्नातील भारत बनण्यास वेळ लागणार नाही, याचे जिवंत आदर्श उदाहरण जि.प.प्राथमिक शाळा पळसखेड येथील शिक्षकवृंद यांनी दाखवून दिले.

विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त गुण ओळखून त्यांना विशेष वळण दिल्यास केवळ नोकरी हेच सर्व काही नसून त्याच्या अंगातील सुप्त गुण हे सुदधा त्यांचं जीवन सुखमय बनवू शकते, विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी ,त्यांच्यातील कार्यत्मक गुण ओळखून त्याला वाव देण्यासाठी शिक्षक सर्वश्री चव्हाण सर, देशमुख सर, दाभेराव सर,तसेच मेश्राम मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले. त्याबद्दल गावकरी मंडळी कडून शिक्षक वृंदावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे