Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

महामार्गावरील वाडे फाटा येथे चालत्या शिवशाही बसला लागली आग

महामार्गावरील वाडे फाटा येथे चालत्या शिवशाही बसला लागली आग

MB NEWS (सातारा) प्रतिनिधी :-प्रवाशांना घेऊन पुणे बेंगलोर महामार्गावरून प्रवास करत असताना वाडे फाटा येथील एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने सर्व प्रवासांनी वेळेत बसमधून खाली उतरल्याने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. साताऱ्यातील वाडे फाटा नजीक ही दुर्घटना घडल्याने सातारा शहरात या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. या आगीच्या दुर्घटनेची माहिती सातारा अग्निशमन दलाल कळतात तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन या बसला लागलेली आग विजवून या आगेवर नियंत्रण मिळवले आहे. शिवशाही बसला कशामुळे आग लागली, याबद्दलचा अधिक तपास एसटी महामंडळ तसेच सातारा पोलीस करत असून सुखरूप असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या एसटी बस मधून प्रवासासाठी पाठवण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे