Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

उभ्या बसला लागली भीषण आग, आगीत बस जळून खाक

उभ्या बसला लागली भीषण आग, आगीत बस जळून खाक

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र)-छत्रपती संभाजी नगर शहरातील नारळीभाग येथे सवेरा ट्रॅव्हल्स पार्किंग आहे या ठिकाणी उभे असलेल्या एका बसला अचानक आग लागली यागी मध्ये बस संपूर्णपणे जळून खाक झाले. ही घटना मंगळवार दिनांक 15 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये जीवित हानी टळली. याप्रकरणी स्थानी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीराजे शहरातील नारळी विभाग येथे सवेरा ट्रॅव्हल्स या बस कंपनीची पार्किंग आहे. या पार्किंग मध्ये नियमित बस उभे असतात. दरम्यान मंगळवार दिनांक 15 रोजी सायंकाळी 9 वाजेच्या सुमारास पार्किंग मध्ये उभे असलेली बस ने अचानक पेट घेतला. यामध्ये आगीने रौद्ररूप धारण केले. यात संपूर्ण बस जळून खाक झाली. याच पार्किंग मध्ये ऑइलचा देखील टॅक्टर असल्यामुळे या ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र सुदैवाने या ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही कुठलीही जीवित हानी झाली नाही.ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकले नाही.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे