Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

मुंबईतल्या कामाच्या मुलाखती चेन्नईमध्ये कशासाठी? आदित्य ठाकरेंचा आरोप

वेदांताच्या अध्यक्षांवर ट्विट करण्यासाठी दबाव आणला गेला, असा आरोप बुधवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत केला.

मुंबईतल्या कामाच्या मुलाखती चेन्नईमध्ये कशासाठी घेतल्या जातायत, असा सवालही त्यांनी शिंदे सरकारला केला.

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. आदित्य म्हणाले, काम वर्सोवा – वांद्रे सी लिंक मुंबईतील कामासाठी चैन्नईमध्ये मुलाखती कशा झाल्या.

मुख्यमंत्री शिंदेंच्या परवानगीने हे चालले आहे का? येथे महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या हाताला रोजगार नाही आणि मुंबईतील कामांसाठी चैन्नईत का झाले याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्यावे. जॉब कुणालाही द्यावा. मात्र, मुलाखती तिकडे का? महाराष्ट्रातील गोष्टीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादेत मुलाखती का घेतल्या नाही? आपल्याकडे तज्ज्ञ इंजिनिअर कमी आहेत का? माझ्या प्रश्नांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावे, असे आव्हान आदित्य यांनी दिले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, शिंदेंची ही 8 वी दिल्लीवारी आहे, ही दिल्लीवारी स्वत:साठी आहे की महाराष्ट्रासाठी आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. राज्यातील किती प्रकल्पांना या सरकारने स्थगिती दिली? उद्धव ठाकरेंचे काम आता खोके सरकारला दिसत असेल असा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे. वेदांताच्या अध्यक्षांना ट्विट टाकण्यासाठी दबाव टाकण्यात आला, असे म्हणतानाच स्थगिती सरकारने किती प्रकल्पांना स्थगिती दिली? वेदांतावर सरकारचे अद्याप उत्तर नाही. बल्क ड्रग पार्कही राज्याबाहेर गेला मात्र सरकार शांतच असल्याचे ते म्हणाले.


हेही वाचा

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची हायकोर्टात धाव, याचिकेवर उद्या सुनावणी

उद्धव ठाकरेंचा दुसरा मुलगा राजकारणात येण्याच्या रंगल्या चर्चा

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे