भक्तिमय वातावरणात चांदूर रेल्वे शहरात जलाराम बापा जयंती संपन्न.

भक्तिमय वातावरणात चांदूर रेल्वे शहरात जलाराम बापा जयंती संपन्न..

MB NEWS (प्रतिनिधी):- अतुल प्र.उज्जैनकर:-श्री जलाराम बापा हे एक गुजराती हिंदू संत होऊन गेले ,ते एक मोठे राम भक्त होते, अशा या महान संताला मानणारे शहरातील प्रतिष्ठित नागरिक गिरधारीलाल् चंदाराणा हे आपल्या सचिन चंदाराणा, निलेश चंदाराणा आणि पिंटू चंदाराणा या आपल्या तिन्ही पुत्रांच्या सक्रिय सहभागाने दरवर्षी आपल्या स्वगृही मोठ्या उत्साहात जलाराम जयंती साजरी करत असतात .दरवर्षी दीपोत्सवाच्या या काळामध्ये बापांच्या जयंती उत्सवाच्या दिवशी अभिषेक, पूजा ,अर्चे सह मोठ्या भक्तीभावाने हा जयंती उत्सव साजरा केल्या जातो. जयंतीच्या प्रित्यर्थ भव्य महाप्रसादाची आयोजन सुद्धा चंदाराणा परिवार आपल्या दरवर्षीच्या परंपरेनुसार करीत असतात. शहरातील सर्वच स्तरातील लोक तसेच अनेक भाविक भक्त ह्यांनी महाप्रसादचा आवर्जून लाभ घेताला. चंदाराणा परिवारातील जेष्ठ पुत्र सचिन चंदाराणा, कन्या विरल – सेजल चंदाराणा, जयश्री चंदाराणा, राम चंदाराणा,वल्लभ चंदाराणा,प्रफुल चंदाराणा, शीतल चंदाराणा,तिलक चंदाराणा, कुदंनबेन खंडेदिया ,प्रणालाल वासानी, निर्मलाबेन वासानी , मंजुलाबेन चंदाराणा,योगेश वासानी, ललित वासानी, सतीश जैस्वाल ,प्रशांत माकोडे , संजय उज्जैनकर ,दिनेश मारोटे , तिखे बाप्पू ,गुड्डू शर्मा,विक्की राय , गोलू जालान , हर्षल वाघ,साजिद जाणवानी ,प्रशांत बोबडे ,दीपक भारूका, मारोती भोले , चंदू बागडे ,अतुल उज्जैनकर ह्या सर्व मंडळींनी अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे