Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

श्री रामदेवबाबा ‘अन्नकुट प्रसादी कार्यक्रम उत्साहात संपन्न..”जय बाबेरी” म्हणत हजारो भक्तांनी महाप्रसाद केला ग्रहण..

श्री रामदेवबाबा ‘अन्नकुट प्रसादी कार्यक्रम उत्साहात संपन्न..”जय बाबेरी” म्हणत हजारो भक्तांनी महाप्रसाद केला ग्रहण..

MB NEWS प्रतिनिधी :- (अतुल प्र.उज्जैनकर) :-स्थानिक गणेडीवाल ले – आउट सिनेमा चौक येथे स्थित श्री रामदेव बाबांच्या मंदिराचा ‘अन्नकुट प्रसादी’ कार्यक्रम मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला.दीपावलीच्या ह्या मंगलमय पर्वावर दरवर्षीप्रमाणे ऋणीचा ( राजस्थान) निवासी श्री रामदेव् बाबा यांच्या मूर्तीचा अभिषेक ,पूजन ,भजन व आरती करून सर्व धार्मिक सोपस्कार मोठ्या भक्तीभावाने पार पडले.ह्या कार्यक्रमाला शहरातील अनेक भक्तांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला. बाबांचा सर्व धार्मिक विधी समापनानंतर सर्व भाविकांसाठी ‘भव्य अन्नकुट प्रसादी’ आयोजित करण्यात आली होती. ह्या अन्नकुट महाप्रसादाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला. ह्या कार्यक्रमासाठी मंदिराचे तथा नगर नवदुर्गा मंडळाचे सर्वेसर्वा सतीश जैस्वाल ,प्रशांत माकोडे ,संजय उज्जैनकर , दिनेश मारोटे , राजू गोलेच्छा, सचिन चंदाराणा, सुनील राऊत, साजिद जाणवानी , गोपाल कालावटे ,रमेश उदयपूरिया , गोलू जालान , विक्की राय , रामभाऊ देशमुख , प्रशांत मस्के, अनिल खेतान, विनोद ठाकरे , नरेंद्र मेश्राम, धनंजय भूत ,अतुल उज्जैनकर , प्रमोद कानतोडे , अश्या अनेक कार्यकर्त्यानी हा कार्यक्रम आपल्या अथक परिश्रमाने यशस्वी केला.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे