Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

शेवटच्या दिवशीही यशोमती ठाकूर यांचा प्रचाराचा झंजावात विविध संस्था, संघटना व अपक्ष उमेदवारांच्या पाठिंब्याने यशोमतींचा विजय निश्चित

शेवटच्या दिवशीही यशोमती ठाकूर यांचा प्रचाराचा झंजावात विविध संस्था, संघटना व अपक्ष उमेदवारांच्या पाठिंब्याने यशोमतींचा विजय निश्चित

MB NEWS अमरावती ( प्रतिनिधी):-
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. तिवसा मतदार संघातील शेवटच्या गावापर्यंत पदयात्रा काढून यशोमती ठाकूर यांनी नागरिकांची संवाद साधला. या दौऱ्यात त्यांना विविध संस्था आणि संघटनांचा सोबतच काही उमेदवारांचा देखील बिनशर्त पाठिंबा मिळाल्यामुळे यशोमती ठाकूर यांचा विजय निश्चित झाला आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघात प्रचाराचा झंजावात शेवटच्या दिवस पर्यंत कायम ठेवला.सुरुवातीपासूनच त्यांनी प्रचारात आघाडी घेत विरोधकांना निवडणूक सोपी नसल्याचे दाखवून दिले. सर्वच गावातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आश्वासन दिले. तिवसा मतदार संघातील सर्वच गावात यशोमती ठाकूर यांनी विविध योजना राबवून विकासाची गंगा पोहोचवली. पाणीपुरवठा योजना, घरकुल योजना आणि आरोग्याच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देत यशोमती ठाकूर यांनी मतदार संघाचा विकास केला.
रस्ते, शिक्षण,आरोग्य तसेच इतरही महत्त्वाचे विकास कामे मतदार संघात करून यशोमती ठाकूर यांनी नागरिकांमध्ये एक आदराचे स्थान निर्माण केले. आपला नेता कसा असावा,तर तो सर्व गुण संपन्न असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे यशोमती ठाकूर आहे.असे मत नागरिकांनी प्रचार दौऱ्यात व्यक्त केले.
आज शेवटच्या दिवशी मार्डी, दिवानखेड, घोटा, चिखली, वीरगव्हाण येथे पदयात्रा काढून यशोमती ठाकूर यांनी नागरिकांशी संवाद साधला. संपूर्ण तालुक्यात व तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांना निवडून येण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. प्रत्येक गावात यशोमती ठाकूर यांचे जंगी स्वागत करण्यात येत असून नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

विविध संस्था व संघटनांचा पाठिंबा
तिवसा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवीत असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांना विविध संस्था व संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळणाऱ्या त्या जिल्ह्यातील एकमेव उमेदवार ठरल्या आहे. आजपर्यंत त्यांना अपक्ष उमेदवारासोबतच सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील अनेक घटकांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा विजय अधिक सुनिश्चित झालाय. वाढत्या पाठिंबामुळे यशोमती ठाकूर ह्या चौथ्यांदा सहज विजयी होतील असेच चित्र मतदार संघात आहे. अखिल भारतीय बारी समाज राजकीय विचार मंच, अपंग जनता दल, अण्णाभाऊ साठे समता परिषद सामाजिक संघटना, विदर्भ प्रदेश मातंग समाज संघ यांनी शेवटच्या दिवशी पाठिंबा देऊन यशोमती ठाकूर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प केला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे