Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड,राष्ट्रीय अध्यक्षपदी मनोहर सुने तर राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी युसुफ खान 

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड,राष्ट्रीय अध्यक्षपदी मनोहर सुने तर राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी युसुफ खान 

MB NEWS चांदूर रेल्वे (अमरावती):-अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या आजीव सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा रविवार १ डिसेंबर रोजी चांदूर रेल्वे परिसरातील हॉटेल गोविंदवाडा येथील हॉलमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात सन २०२५ ते २०३० कालावधीसाठी अ.भा.ग्रा. पत्रकार संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदी मनोहर सुने, राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी युसुफ खान, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदीप जोशी, राष्ट्रीय संघटक कैलासबापू देशमुख, राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश सवळे, राष्ट्रीय चिटणीस अशोक पवार, राष्ट्रीय महिला संघटक सौ. जयश्री पंडागरे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अशोक याऊल, राष्ट्रीय प्रवक्ता माणिकराव ठाकरे, राष्ट्रीय विधी सल्लागार सौ. किरण भुते, राष्ट्रीय सदस्य अंबादास सिनकर, बाळासाहेब सोरगीवकर, प्रा. रवींद्र मेंढे, अभिमन्यू भगत यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, राज्य संघटक संजय कदम, अंबादास सिनकर, राष्ट्रीय कार्यालय प्रमुख पदी बाबाराव खडसे यांची निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे सर्व राज्य सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे