स्वामी समर्थ संस्थानात श्री दत्त जन्मोत्सव हर्षोल्हासात संपन्न.. विविध धार्मिक कार्यक्रमाचे केले आयोजन.

स्वामी समर्थ संस्थानात श्री दत्त जन्मोत्सव हर्षोल्हासात संपन्न.. विविध धार्मिक कार्यक्रमाचे केले आयोजन.

स्वामी भक्तांसाठी भव्य ‘महाप्रसाद’…हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.

MB NEWS (चांदूर रेल्वे) प्रतिनिधी :- अतुल उज्जैनकर चांदूर रेल्वे :-श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार सेवा संस्थान ,स्वामी समर्थ नगर पत्रिकर कॉलनी च्या मागे प्रगतीपथा असलेल्या संस्थानात नुकत्याच पार पडलेल्या श्री दत्त जन्मोस्तावा निमित्य श्री गुरु चरित्र पारायण पाठ व अखंड नाम जप सप्ताहा सोबतच विविध धार्मिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.ह्या कार्यक्रमांमध्ये दत्त संप्रदयातील सुप्रसिद्ध ग्रंथ म्हणजे ‘ श्री गुरु चरित्र ग्रंथा चे सातही दिवस पारायण पाठ करण्यात आले. श्री गुरु चरित्र पारायण पाठाला २५ – ३० स्वामी भक्त बसले होते .सातही दिवस स्वामींचे अभिषेक पूजा , नैवैद्य आरती , विष्णू सहस्त्र नाम जप सोहळा तसेच १४ डिसेंबर रोजी दुपारी १२:३९ वाजता श्री दत्त जन्म ,दुपारी २ वाजता टाळ मृदूगांच्या गजरात “निघालो घेऊन दत्ताची पालखी” ह्या सुमधुर भजनाच्या ठेक्यावर अतिशय हर्षोल्हासात श्रींच्या पालखीचे संपूर्ण परिसरातून भ्रमण दिंडी काढण्यात आली ,ह्या पालखी सोहळ्यात परिसरातील अनेक जेष्ठ नागरिक , पुरुष ,महिला ,युवक ,युवत्या तसेच लहान मुले असे अनेक स्वामी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखी सोहळ्या नंतर दिगंबर डुबे ,अमोल वानखडे व भजनी मंडळ यांच्या सुमधुर वाणीतून काल्याचे अभंग व महा आरती गायणा नंतर गोपाळ काल्याचे वितरण करून हा मंगलमय सोहळा उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला. सायंकाळी ६:०० ला नैवद्य आरती नंतर भव्य महाप्रसाद कार्यक्रमाला प्रारंभ झाला ,हजारो भाविकांनी ह्या ‘महाप्रसाद’ ग्रहण करून तृप्तीची ढेकर दिली. श्री दत्त जयंतीच्या ह्या बहारदार सोहळ्याचे आयोजन करून हा मंगलमय सोहळा यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी संस्थानाचे अध्यक्ष अतुल चांडक , प्राविण्य देशमुख ,नितीन महल्ले ,अनंत कडुकर, पिंटू डुबे , अनिल गावंडे, प्रमोद देशमुख ,सचिन होले, जितेंद्र गोरे, बिपीन देशमुख, जगदीश होले, श्याम जगताप, केतन चौहान, निखिल चव्हाण काका , निखिल चव्हाण, प्रकाश होले, विजय मिसाळ, सिद्धेश भैसे, जय बाबर, सौ. प्रतिभा डोंगरे , सौ. प्रियांका देशमुख, कु.रेणू देशमुख सौ.रीना कडुकर, सौ.कविता चौधरी , सौ. चव्हाण , सौ.पूनम चव्हाण, रसिका कदम , वैशाली माहुलकर ,दीपाली मिसाळ , सौ.गावंडे , सौ.राजूरकर ,सौ.शिंगाने,श्रीमती जगताप काकू, अशा अनेक स्वामी सेवेकऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेतले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे