तिवसा येथे अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी..!आमदार राजेश वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत
MB NEWS तिवसा (सुनिल घोरमाडे प्रतिनिधी):-दि. २५ डिसेंबर २०२४ रोजी श्री राजर्षी शाहु महाराज सा. वाचनालय तिवसा येथे अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे १० वे पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते. ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत ते पंतप्रधान होते अशा या महान व्यक्तीची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले तिवसा विधानसभा मतदार संघांचे नवनियुक्त आमदार मा. श्री. राजेशजी वानखडे यांच्या हस्ते श्री अटलजी बिहारी यांच्या प्रतिमेचे पुजन करून हारार्पण करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सौ.छायाताई दंडाळे
श्री.प्रदीपभाऊ गौरखेडे,संजयजी चांडक,आशिषभाऊ ढोले,दिनेशभाऊ लांडगे,अजयभाऊ गुल्हाने अनिकेत वानखडे राजाभाऊ देशमुख, सतीशभाऊ नंदनवार अंकुश देशमुख,राजेशभाऊ बावरी,आकाशभाऊ बावरी
सुरजभाऊ तवर यांनी सुद्धा प्रतिमेचे पूजन करून श्री अटलजी बिहारी यांना अभिवादन केले. कार्यक्रमाला प्रशांत डगवार ,विशाल गडलिंग ,सौरभ डहाके, सौरभ इंगळे, सौरभ कठारने.पूजा गडलिंग , प्रिया डहाके रुपाली राऊत वैष्णवी गोवत्रे, दिपकभाऊ धानोरकर, राहुल धडांगे व इतर वाचक वर्ग उपस्थित होते.

