Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आमदार केसरी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन – पंकज पाटील

आमदार केसरी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन – पंकज पाटील

MB NEWS (कराड) संजय पाटील :-कराड तालुक्यातील मौजे साळशिरंबे येथे बुधवार दि. १ जानेवारी २०२५ रोजी भव्य ओपन बैलगाडी शर्यतीचे आयोजन पंकज पाटील मिञ परिवाराच्या वतीने करण्यात आल्याची माहिती सोशल मिडीया सातारा जिल्हा उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी दिली.

कृष्णा उद्योग समुहाचे शिल्पकार सहकार महर्षी स्व.जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या 100 व्या जयंतीदिना निमित्त
मा.आ.डॉ.अतुल भोसले (बाबा) हे प्रचंड मताधिक्याने निवडून आमदार झाल्याबध्दल नवीन वर्षावर कराड तालुक्यातील पाहिले ओपन बैलगाडी शर्यत मैदान होत असून, अतुलपर्व १ ले पर्व म्हणून “आमदार केसरी” भव्य ओपन बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आलेली आहे. प्रथम पारितोषिक १ लाख रु. व ढाल, बक्षीस ठेवण्यात आले आहे, व्दितीय पारितोषक ७१ हजार १११ रु. व ढाल, तृतीय पारितोषिक ५१ हजार १११ रु. व ढाल, चतुर्थ पारितोषक ३१ हजार १११ रु. व ढाल, पंचम पारितोषक २१ हजार १११ रु. व ढाल, सहावा पारितोषक १५ हजार १११ रु. व ढाल, सातवा पारितोषक ११ हजार १११ रु. व ढाल. सर्व फायनलच्या गाडी चालकास मानाचे फेटे देण्यात येणार आहेत.
शर्यातीस प्रमुख उपस्थिती आमदार मा.डॉ.अतुलबाबा भोसले, माजी आमदार श्री.आनंदराव पाटील (नाना), कृष्णा विश्व विद्यापीठ विश्वस्थ मा.विनायकजी भोसले (बाबा) यांची राहणार आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे