Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांचे सातारा जिल्ह्यामध्ये, पुसेसावळी नगरीमध्ये जंगी स्वागत

ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांचे सातारा जिल्ह्यामध्ये, पुसेसावळी नगरीमध्ये जंगी स्वागत

MB NEWS (सातारा) संजय पाटील ब्युरोचिफ :-महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज खात्याचे कॅबिनेट मंत्री ना.जयकुमार गोरे भाऊ यांचे विविध मान्यवरांसह भारतीय जनता पार्टी पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.

मंत्री जयकुमार गोरे यांची खास तयार केलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक सावंता माळी मंदिर आझाद चौक पासून सुरू झाली ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले तर ग्रामस्थांनी हार-तुरे देऊन त्यांचा सत्कार केला. दत्त चौक पुसेसावळी येथे क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार,जेसीबी मधून पुष्पवृष्टी, फटाक्याची मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी अशा पुसेसावळी जि.प.गटाचे युवा नेतृत्व विक्रमबाबा कदम यांच्या नेटक्या नियोजनामुळे जल्लोषात झालेल्या या स्वागतामुळे मंत्री गोरे ही भारावून गेले.

यावेळी भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष मा.धैर्यशीलदादा कदम,कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे,भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस मा. रामकृष्ण वेताळ साहेब, भाजपा रहिमतपुर मंडल अध्यक्ष मा.भीमरावकाका पाटील, कराड मंडल अध्यक्ष मा.शंकरकाका शेजवळ, उद्योजक मा.सत्वशील कदम, गोरेगाव वांगीचे माजी सरपंच मा.रवीदादा कदम यांचेसह पुसेसावळी जि.प.गटातील सर्व भाजपा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे