Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

कराड तालुक्यातील शेवाळवाडी या ठिकाणी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

कराड तालुक्यातील शेवाळवाडी या ठिकाणी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार 

MB NEWS (संजय पाटील ) :कराड तालुक्यातील शेवटचे गांव  शेवाळवाडी या ठिकाणी कराड चांदोली महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक  बिबट्या ठार झालेला आहे.
आज सायंकाळी सात वाजता ही घटना घडली शेवाळवाडी हे ठिकाण कराड तालुक्यातील कराड दक्षिण विभागात येत असून या ठिकाणी वनीकरणाने संपूर्ण डोंगर पठारावर अतिशय नियोजित पद्धतीने झाडांचे जतन केलेले असून या ठिकाणी मोठे जंगल असून वन्य प्राण्यांचा नेहमी वावर असतो .सर्वत्र बागायती क्षेत्र असल्यामुळे या गावात सध्या कारखान्याच्या ऊस तोडी चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र मोकळे होत असल्यामुळे अनेक बिबटे, कोल्हे, लांडगे, तरस वारंवार शेतकऱ्यांना नजरेस पडत असतात. शेतकऱ्यांच्या जनावरांवर मोठ्या प्रमाणात बिबट्याने  हल्ले करून अनेक जनावरे ठार केलेली आहेत. यामुळे या ठिकाणी नेहमी बिबट्यांचा वावर असतो आज सायंकाळी सात वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी होऊन थोड्या वेळातच गतप्राण झाला. या ठिकाणी वनीकरण विभागाचे अधिकारी आल्यानंतर पंचनामा करून  शासनाच्या नियमानुसार पुढील सोपस्कार पार पाडले जातील.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे