Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळा तळेगाव ठाकुर येथील मुलींनी माध्यमिक विभागात चॅम्पियन तिवसा तालुक्यात धनश्री कातोरे हिने उत्कृष्ट खेळ करत विशेष लक्ष वेधले

जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळा तळेगाव ठाकुर येथील मुलींनी माध्यमिक विभागात चॅम्पियन
तिवसा तालुक्यात धनश्री कातोरे हिने उत्कृष्ट खेळ करत विशेष लक्ष वेधले

MB NEWS (तिवसा) सुनिल घोरमाडे -तालुका स्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव तिवसा येथे आयोजित कार्यक्रमा मध्ये जिल्हा परिषद पूर्व कन्या माध्यमिक शाळा तळेगाव ठाकुर येथील मुलींनी माध्यमिक विभागाचे चॅम्पियन विजेती ठरली.
तळेगाव ठाकुर येथील मुलींनी खूप मेहनत करून उत्कृष्ट खेळ केला.धनश्री कातोरे ह्या मुलीने सर्व खेळा उत्कृष्ट खेळ करत तिवसा तालुक्यात शाळेचे व गावाचे नाव रोशन केले.जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेतील विजयी ठरलेले खेळ हॉलीबॉल मुली-विजयी,टेनीक्वाईट एकेरी -विजयी,टेनीक्वाईट दुहेरी-विजयी,बॅडमिंटन दुहेरी-उपविजयी, रिले रेस-उपविजयी व प्राथमिक विभाग मध्ये लंगळी स्पर्धेत विजयी ठरल्या.अशा प्रकारे उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजा खेचून आणला.सर्व विजयी खेळाडूंचे तसेच शाळेतील मुख्याध्यापक सौ.वर्षा कावळे तसेच सर्व खेळ प्रभारी शिक्षक श्री.निलेश कांडलकर,श्री.नवनीत निशाण,श्री.वाळवे सर,श्री.माळोदे सर,सौ.सुनिता ढाले,सौ.संगीता गाडगे,सौ.टाकरखेडे यांचे आभार शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष तथा सदस्य,गावातील समस्त नागरिकांनी अभिनंदन केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे