पात्र बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र द्या अन्याथा आंदोलन सरपंच संघटनेचा इशारा 

पात्र बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र द्या अन्याथा आंदोलन सरपंच संघटनेचा इशारा 

MB NEWS (सुनिल घोरमाडे) –ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक संघटने कडून 90 दिवस काम केल्या बाबतचे प्रमाणपत्र न देण्याची भूमिकेवर ठाम असल्यामुळे ग्रामीण भागातील पात्र लाभार्थी सुद्धा दाखला मिळत नसल्याने बांधकाम कामगारां साठी शासनाच्या कल्याणकारी योजने पासून वंचित राहात आहे
विशेष म्हणजे ही योजना  विद्यार्थी शिष्यवृत्ती / बाळनपण अर्थसाहाय्य / कुटुंबाला संसारीक साहित्य / विवाहा करिता आर्थिक साहाय्य / आरोग्य विषयक _
*अशा विविध महत्वपूर्ण बाबींशी समंधित असून दाखला मिळत नसल्याने शासनाच्या अनेक प्रभावी लोकोपयोगी योजना ठप्प झाल्या आहे व या पासून लोकं वंचित राहत आहे ग्रामीण भागातील लोकांना किती दिवस योजने पासून वंचित ठेवणार असा सवाल सरपंच संघटने कडून करण्यात आला.याबाबत गेल्या काही महिन्या पासून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे काही दिवसा पूर्वी *गटविकास अधिकारी कामगार संघटना सरपंच संघटना ग्रासेवक संघटना* यांनी संयुक्त चर्चा करून गटविकास अधिकारी यांनी यावर तोडगा काढला होता मात्र ग्राम सेवक युनियन ने पुन्हा दाखले देण्यास नकार दिल्यामुळे पारिस्थिती जैसे थे आहे अशात गावातील लोकं सरपंच यांचे कडे समंधित योजना आम्हाला का मिळत नाही या बाबत विचारणा करतात पात्र आणि गरजू लाभार्थी वंचित राहत असल्यामुळे गावात रोष_ _निर्माण होत आहे.

गटविकास अधिकारी यांनी यावर तोडगा काढून लोकांना न्याय देण्यासाठी वरील विशय तात्काळ मार्गी लावावा अन्यथा सरपंच संघटना कामगार संघटना, वंचित लाभार्थी यांचे सह आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका घेत सरपंच संघटना तिवसा च्या वतीने निवेदन देण्यात आले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे