Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

शिवकृपा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था शाखा चांदूर रेल्वे च्या अध्यक्षपदी उमेंद्र ढगे..

शिवकृपा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था शाखा चांदूर रेल्वे च्या अध्यक्षपदी उमेंद्र ढगे..

MB NEWS प्रतिनिधी :-अतुल उज्जैनकर

चांदूर रेल्वे शहरातील नामवंत पतसंस्था शिवकृपा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था चांदूर रेल्वे शाखेच्या अध्यक्षपदी पूज्य संत गाडगेबाबा विद्यालय व क.म. वि. चे मांजरखेड कसबा चे प्राचार्य तथा मुख्याध्यापक उमेंद्र रामरावजी ढगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बी.डी. एस. हायस्कुल तथा कनिष्ट महाविद्यालया चे प्राचार्य अशोक मोटघरे हे होते परंतु ३० जानेवारी रोजी अशोक मोटघरे हे नियत वयोमानाने निवृत्त झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते त्यामुळे दिनांक 9 फेब्रुवरी रोजी संस्थेचे अध्यक्ष पदाची फेर निवड करण्याची प्रक्रिया पार पडली.यात पतसंस्थेचे अध्यक्षपदी उमेश ढगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .त्या बद्दल पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने तसेच गाडगेबाबा विद्यालयाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष

अशोक मोटघरे ,पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल थोटे,संचालक दारासिंग राठोड. गजानन चव्हाण, चंद्रशेखर कडुकार,रमेशराव धवने,प्रमोदराव ढगे,तसेच सचिव अनिल जिवतोडे.व्यवस्थापक राजेश बोळे हे उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे