Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तिवसा, आर्वी डेपोतून धामंत्रीसाठी बसेस. भाविकांच्या सोयीकरिता मंदिर संस्थाकडून विभागाला पत्र

 तिवसा, आर्वी डेपोतून धामंत्रीसाठी बसेस.
भाविकांच्या सोयीकरिता मंदिर संस्थाकडून विभागाला पत्र

MB NEWS (सुनिल घोरमाडे)तिवसा :
तिवसा तालुक्यातील श्री. क्षेत्र धामंत्री येथील प्राचीन ज्योतिलिंग असलेल्या नागेश्वर महादेव मंदिर येथे दर्शनाकरिता महाशिवरात्री निमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे.त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील आर्वी डेपो तसेच तिवसा डेपोतून धामंत्री येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या प्रवासाकरिता बस सोडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी नागेश्वर महादेव मंदिर संस्थाचे अध्यक्ष कैलासकुमार पनपालिया यांनी दिली असून याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन केले आहे.

पुरातन काळाचा इतिहास असलेल्या धामंत्री येथील नागेश्वर महादेव मंदिराचा उल्लेख हा महाभारत असून याठिकाणी मोठमोठ्या ऋषीमुनींनी तपस्या केलेली आहे. वशिष्ठ पुराणांमध्ये सुद्धा या मंदिराची नोंद असल्याने भाविकांची मोठी श्रद्धा आहे. तसेच नागेश्वर ज्योतिर्लिंग हे स्वयंभू असल्यामुळे या मंदिराची विशेष अशी ओळख आहे. त्यामुळे जिल्ह्यासह विदर्भातून भाविक याठिकाणी महाशिवरात्रीला दर्शनासाठी मोठी गर्दी करतात दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असल्यामुळे संस्थाकडून यावर्षी एसटी महामंडळाकडे धामंत्रीकरिता बसेस सोडण्याची मागणी केली होती याच अनुषंगाने अमरावती कुऱ्हा मार्गे, आर्वी कौडण्यपूर मार्गे व तिवसावरून वरखेड मार्गे पाच फेऱ्यामध्ये बस सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन नागेश्वर महादेव मंदिर संस्थाकडून करण्यात आले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे