Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तिवसा येथे तुर खरेदीचा शुभारंभ शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

तिवसा येथे तुर खरेदीचा शुभारंभ शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

MB NEWS (सुनिल घोरमाडे) प्रतिनिधी – तिवसा येथील कृषी उत्पन्न हाजार समितीमध्ये शनिवारपासून (ता.१)नाफेडच्या तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. माजी मंत्री अॅड. यशोमतीताई ठाकूर , खासदार बळतंवराव वानखजडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ११ पासून तुर खरेदीला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. ७५५० रुपये प्रतिक्लिंटल प्रमाणे तुरीला हमीभाव देण्यात आला.
शनिवारी सकाळी ११ वाजता तिवसाकृषी उत्पन्नन बाजार समितीच्या प्रांगणात तूर खरेदीला सुरूवात झाली. यावेळी काही निवडक शेतकऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार सुद्दा करण्यात आला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक सुरेश साबळे, तिवसा तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीचे सभापती सुरेश मेतकर, उपसभापती सुरेश धवणे, संचालक प्रफुल्ल देशमुख, लुकेश केणे, प्रकाश बोके, जयकिशन उताणे, प्रवीण साबळे, आकाश माहोरे, प्रमोद देशमुख, राजेश थोरात, प्रफुल बायस्कर, सचिन सोटे, मंजुषा गवड, वृंदा काळमेघ, सेतूभाउ देशमुख, दीपक गोफणे, सुरेशहभाउ साबू, दिलीपभाउ पांडे, विलासराव माहोरे, रवीभाउ राउत, वैभव वानखडे, योगेश वानखडे, कमलाकर वाघ, सुनिताताई अळसपुरे, रुपाली काकडे, आशीष बायस्कर, मनोज साबळे, स्वप्निल केने, सुनिताताई गौरखेडे, वैशाली देशमुख, संदीपभाउ आमले,आकाश माहोरे, मिलिंद काळमेघ, भारतभाउ ढोणे, राजेशभाउ चौधरी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे