वणी ममदापूर इथे गावालगतच्या शेतशिवारा नजीकच्या जंगलात अचानक आग लागली.

वणी ममदापूर इथे गावालगतच्या शेतशिवारा नजीकच्या जंगलात अचानक आग लागली.

MB NEWS (तिवसा) सुनिल घोरमाडे :- गावातील लोकांनी फोनवरून आरतीताई राजेशभाऊ वानखडे यांना माहिती दिली असता लगेच आरतीताई यांनी स्वतः गावालगतच्या घटना स्थळी आपल्या कार्यकर्ते आणि मित्र परिवारासह पोहोचून पाणी व इतर उपलब्ध माध्यमातून आग विझविण्याचा प्रयत्न केला.आगीचे रौद्ररूप पाहून संबंधित फायर ब्रिगेडच्या गाड्या त्वरित तिवसा तथा अमरावती येथून फोन वरून संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून पाठवण्यास सांगितले. दोन फायर ब्रिगेडच्या गाड्याच्या साहाय्याने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात विझवण्यात यश आले.
*अगदी गावाला लागून लागलेल्या या आगीने पाहता पाहता मोठे रौद्र रूप धारण केले होते योग्य वेळी आरतीताई वानखडे या मदतीसाठी पोहचल्या नसत्या योग्य ती मदत उपलब्ध करून दिली नसती तर आज खूप मोठे नुकसान अनर्थ वणी येथे झाला असता.
प्रसंगावधान राखून आरतीताई यांनी त्वरित संपर्क करून मदत उपलब्ध करून दिल्यामुळे मोठे नुकसान टळले.यावेळी वणी गावातील नागरिकांनी आरतीताई यांचे आभार मानून लोकप्रतिनिधींच्या पत्नी एका हाकेवर एका फोन कॉलवर जनतेच्या सुख दुःखात कठीण प्रसंगात स्वतः हजर असतात याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी आरतीताई सह भाजपच्या जिल्हा ग्रामीणच्या उपाध्यक्षा छायाताई दंडाळे व तिवसा येथील अनेक कार्यकर्ते मदत करण्यास घटना स्थळी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे