Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

श्री विठोबा संस्थान मार्फत आज होणार भव्य रक्तदान शिबीर;डॉ. सदानंदजी बर्मा ब्लड बँक,परतवाडा यांच्या सौजन्याने होणार रक्तसंकलन

श्री विठोबा संस्थान मार्फत आज होणार भव्य रक्तदान शिबीर;डॉ. सदानंदजी बर्मा ब्लड बँक,परतवाडा यांच्या सौजन्याने होणार रक्तसंकलन

MB NEWS (चांदूर रेल्वे) :- तालुक्यातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे गुढीपाडवा – रामनवमी यात्रा महोत्सव सुरु असताना संस्थानने दैनंदिन कार्यक्रम सुरु असताना संस्थान सामाजिक उपक्रम देखील राबवत आहे. अशातच दिनांक 05/04/2025 शनिवारला सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सांस्कृतिक भवन मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान श्री क्षेत्र सावंगा विठोबा आणि परतवाडा येथील डॉ. सदानंदजी बर्मा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबीर आयोजित केले असून संस्थानचे अध्यक्ष श्री पुंजाराम वै.नेमाडे (गुरुजी) यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व उपाध्यक्ष श्री कृपासागर रा.राऊत, सचिव श्री अशोक ह.सोनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
सदर शिबीराचे रक्त संकलन सदर ब्लड बँकची तज्ञ चमु करणार असून रक्तदानास इच्छुकांनी मो. क्र 9970501898, 9403621600 वर संपर्क करून नाव नोंद करावे तसेच संस्थानच्या देणगी कक्षावर सुद्धा नाव नोंदणी सुरु असल्याचे संस्थानच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे