“छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर अभियान”दी. 21/04/2025 ला तिवसा तहसील मध्ये आयोजन; मा.श्री.आमदार राजेश वानखडे तसेच उपविभागीय अधिकारी तिवसा-भातकुली यांची प्रमुख उपस्थिती.
MB NEWS सुनिल घोरमाडे(प्रतिनिधी):- तिवसा-महसूल विभागीय अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता,शेतकरी,विध्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाची संबधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकभिमुख कार्यक्रम व गतिमान करण्यासाठी तालुका स्तरावर महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र.संकीर्ण-2025,प्र.क्र.-34/ई-8 दी. 25 मार्च 2025 अन्वये “गतिमान प्रशासन तथा आपतकालीन व्यवस्थेचे बळकटी करण या योजनेअंतर्गत महसूल कार्यालयाकडून जनतेस सोई सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता “छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान” दी. 21/04,2025 रोजी तहसील कार्यालय तिवसा येथे आयोजीत करण्यात आले.”छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर अभियान मा.श्री.राजेशभाऊ वानखडे आमदार तिवसा विधानसभा मतदारसंघ यांच्या प्रमुख उपस्थित तसेच मा.उपविभागीय अधिकारी तिवसा-भातकुली यांच्या अध्यक्षते खाली दी.21 मार्च 2025 तहसील कार्यालय तिवसा येथे आयोजित करण्यात आले आहे.सदर शिबिरामध्ये मा.आमदार महोदय यांच्या हस्ते शेतकरी,विध्यार्थी,महिला यांना जातींचे दाखले,रेशनकार्ड,सामाजिक लाभाच्या योजना जसे निराधार योजना इत्यादी महसूल विभागाशी संबंधित तसेच तालुका स्तरावरील शासकीय कार्यालयाशी संबंधित तक्रारी निकाली काढण्यात येणार आहे तरी तिवसा तालुक्यातील जनता, विध्यार्थी,महिला यांना जाहीर आवाहन करण्यात आले की,उक्त शिबिरामध्ये जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा.

