Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तिवसा तालुक्यातील 45 ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर

तिवसा तालुक्यातील 45 ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर

MB NEWS (सुनिल घोरमाडे) :-तिवसा तहसील अंतर्गत मार्च २०२५ ते २०३० या कालावधीत तिवसा तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या एकुण ४५ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण गुरुवार २४ एप्रिल रोजी दुपारी १२.०० वाजता स्थानिक तिवसा तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोडत जाहीर करण्यात आले..
या सोडतीत श्री. ज्ञानेश्वर घ्यार उपविभागीय अधिकारी तिवसा / भातकुली तथा नियंत्रक अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली व तिवसा तहसीलदार डॉ. मयुर कळसे व नायब तहसीलदार निवडणूक श्री.अशोक कावीळकर,कारकून प्रविण गिरी व संदीप पंधरे यांच्या उपस्थितीत लहान बालकाच्या हाताने ईश्वरचिठ्ठी द्वारे ४५ ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत काढण्यात आली.
यामध्ये अनुसूचित जाती करिता ६ सरपंच पदाची सोडत काढण्यात आली त्यामध्ये वणी,घोटा, माळेगांव या तीन ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गा करिता राखीव राहणार असून उर्वरित तीन करजगाव, दापोरी खुर्द, धामंत्री या ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिला प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे.
अनुसूचित जमाती भारवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच पद ( महिला ) प्रवर्गाकरिता राखीव राहणार आहे. सातारगाव, दिवानखेड, अनकवाडी,दुर्गवाडा, डेहनी या पाच ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग ( खुला ) राखीव राहणार असून वरखेड, निंभोरा(दे.), शेंदोळा(बू.),मूर्तिजापूर तरोडा, शिरजगाव (मो.) या सहा ग्रामपंचायतीचे पद सरपंच पद नागरिकाचा मागास प्रवर्ग (महिला) राखीव राहणार आहे.
तसेच खुल्या प्रवर्गातून २८ ग्रामपंचायत पैकी तळेगाव ठाकूर, जावरा ( फ.) ठाणाठुनी, गुरुदेवनगर, शेंदोळा(खुर्द ), भिवापूर, कौंडण्यपूर, कवाडगव्हाण, शेंदुरजना (खुर्द), वरुडा, शेंदुरजना (बु.), फत्तेपूर (जा.) वऱ्हा,वाठोडा (खु.) या 14 ग्रामपंचायतीचे सरपंच पद खुल्या प्रवर्गातील राखीव राहणार असून सार्शी,सुरवाडी खुर्द, पालवाडी, मोझरी, शिवणगाव ,सालोरा, धोत्रा, मार्डी, कुऱ्हा ,बोर्डा,चेनुष्ठा ,आखतवाडा, मार्डा,उंबरखेड या 14 ग्रामपंचायतीचे महिला प्रवर्गाकरिता राखीव राहणार आहे..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे