Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

गुरुकुल येथे सुसंस्कार शिबिराला सुरुवातइंजि.अरविंद काळमेघ यांच्या हस्ते झाले उद्घाटन

गुरुकुल येथे सुसंस्कार शिबिराला सुरुवातइंजि.अरविंद काळमेघ यांच्या हस्ते झाले उद्घाटन

MB NEWS (सुनिल घोरमाडे)गुरुकुंज मोझरी: आजचे बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होऊन त्यांच्या खांद्यावरती देशाची धुरा येणार आहे याकरिता या बालमनावरवरती संत महापुरुषांच्या विचारांचे संस्कार करून त्यांना देशाचा उत्तम नागरिक व आधारस्तंभ बनवण्याचे कार्य श्रीगुरुदेव सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून करण्यात येत आहे.
श्रीगुरुदेव आध्यात्म गुरुकुल या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे होणारे सुसंस्कार शिबिराचे उद्घाटन नुकतेच इंजि.अरविंद काळमेघ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेवराव गव्हाळे महाराज असून शिबिरामध्ये संपूर्ण विदर्भातून तेलंगणा मध्य प्रदेश राज्यातून 150 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत.

संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबांचे जीवन चरित्र, ध्यान प्रार्थनेची उपासना व राष्ट्रपुरुषांचे धडे शिकवून विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाची बीज पेरली जातात.लहानपणापासून संत विचाराचे प्रतिबिंब विद्यार्थ्यांच्या मनावरती कोरल्यास विद्यार्थी हे आदर्श दिनचर्या जगतील व घरच्यांना देखील समजावून सांगतील या माध्यमातून एका सरोजनशील समाजाची निर्मिती होईल असे मनोगत उद्घाटनप्रसंगी शिबिराचे उद्घाटक इंजी.अरविंद काळमेघ यांनी व्यक्त केले.

आतापर्यंत दोन लाख पेक्षा जास्त विद्यार्थी संस्कार शिबिरातून संस्कारीत होऊन गेलेले आहेत व ते ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये असतील त्या क्षेत्रामध्ये या संस्काराचा निश्चितच फायदा झाल्याचे दिसून येते आहे त्यांनी त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत स्वतःचे नाव लौकिक केले आहे असे अनुभवाचे गौरवोद्गार मा नामदेवराव गव्हाळे महाराज यांनी काढले.

विद्यार्थ्यांची दिनचर्या सकाळी पाच वाजेपासून सुरू होत असून सामुदायिक ध्यान, योग-प्राणायामाने दिवसाची सुरुवात होते तर दिवसभरामध्ये संत साहित्याच्या अध्ययनासोबत संगीताचे ज्ञान, स्वसंरक्षणार्थ लाठी-काठी, जुडो कराटे शरीर सुदृढ ठेवण्यासाठी मल्लखांब, रोप मल्लखांब , मंकी बार इत्यादी मैदानी खेळाचे देखील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्या जात आहे.

श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुल चे संचालक रवी मानव हे स्वतः विद्यार्थ्यांना बौद्धिक तासिकेच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या साहित्याची शिकवण व वक्तृत्वाचे धडे देणार आहेत. योग प्राणायाम प्रशिक्षक म्हणून मुकेश कोल्हे कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना भजन संगीत शिकवण्यासाठी प्रज्वल टोंगे व शिबिर व्यवस्थापक म्हणून तुलसीदास झुंजुरकार व रुपेश प्रधान, आर्यन बोबडे जबाबदारी पार पाडत आहे.स्वसंरक्षणार्थ जुडो कराटेचे प्रशिक्षण मेजर बंडू खडसे व आर्यन खडसे देत असून लाठीकाठी चे प्रशिक्षण हर्ष बारापात्रे व स्वप्नील बारापात्रे देत आहे.

हे संस्कार शिबिर पूर्णतः लोकसहभागावर अवलंबून असून श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या अनेक शाखांच्या माध्यमातून या ठिकाणी धान्य पाठविल्या जाते तर अनेक देणगीदारांनी एक वेळ जेवणाचा पंगतीचा खर्च देऊन या ठिकाणी सहकार्य केल्याचे दिसून येते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे