पोलीस स्टेशन तिवसा येथील बिना नोंद असलेल्या जाहीर लिलाव

पोलीस स्टेशन तिवसा येथील बिना नोंद असलेल्या जाहीर लिलाव

MB MEWS (सुनिल घोरमाडे)तिवसा-:पोलीस स्टेशन तिवसा अमरावती ग्रामीण च्या आवारात बरेच वर्ष्यापासून एकाच ठिकाणी अनेक मोटार सायकली ठेऊन असल्याने मूल्यहीन होण्याची प्रकिया वेगाने सुरु आहे.सदरची वाहने ठेवण्या करिता जागा अपुरी पडत आहे तसेच सदर वाहणाचे मालक हक्का बाबत आज पर्यंत कोणीही पोलीस स्टेशन ला हजर झाले नाही व येण्याची शाश्वती सुद्धा नसल्याने वाहने अनफिट होत असल्याने मा.उपविभागीय दंडाधिकारी मॅडम भातकुली/तिवसा यांचे आदेश क्र.अका/फौजदारी/काथी-503/2025 21/04/2025 अन्वये दिनांक 06/05/2025 रोजी 71 वाहणाचे लिलाव करण्यात येत आहे.
मा.प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती सदर वाहने भंगार म्हणून किमंत आकारलेली आहे.सर्व वाहने ही पोलीस स्टेशन तिवसा येथे परीक्षण/निरीक्षण करणे करिता उपलब्ध असून लिलावा संबधी असलेल्या अटी,शर्ती व वाहणाची यादी ची सविस्तर माहिती पोलीस स्टेशन तिवसा येथे नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे.लिलावा मध्ये सहभाग घेणाऱ्या व्यवसायिका जवळ कायदेशीर गुमास्ता(भंगार दुकानाचा परवाना),जी एस टी नंबर,आधार कार्ड,पॅन कार्ड बाबत पूर्तता केल्यावर त्यांना लिलावा मध्ये अर्ज भरून सहभागी होता येते.लिलावा मध्ये अनामत रक्कम म्हणून 50000 रु जमा केल्यानंतर लिलावा मध्ये सहभागी होता येइल.अनामत रक्कम ही पोलीस स्टेशन तिवसा येथे 06/05/2025 रोजी सकाळी 07 ते 10 वाजेपर्यंत रक्कम जमा केल्यानंतर अटी व शर्ती चे आधीन राहून लिलावा मध्ये सहभाग घेता येइल.सदर लिलाव कोणतेही कारण न देता रद्द किंवा पुढे ढकलण्याची अधिकार कार्यालयाने राखून ठेवला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे