Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तळेगांव (ठाकूर) येथील सीमा पारधी यांचे निधन; परिसरात शोककळा

तळेगांव (ठाकूर) येथील सीमा पारधी यांचे निधन; परिसरात शोककळा

MB NEWS (तिवसा) : तिवसा तालुक्यातील तळेगांव (ठाकूर) येथील सीमा सतीश पारधी (वय ३३ वर्षे) यांचे दि. ७ मे रोजी रात्री १.३० वाजता सावंगी मेघे, वर्धा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्यावर हिप संयुक्त (कमरेतील बॉल) शस्त्रक्रिया सुरू असताना हा दुर्दैवी प्रकार घडला.

प्राप्त माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी घरकाम करत असताना त्या घरातच अपघाताने पडल्या होत्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या हिप सांध्याची पहिली शस्त्रक्रिया केली होती. मात्र, अपेक्षित आराम न मिळाल्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा शस्त्रक्रियेची गरज भासली. ती शस्त्रक्रिया दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.सीमा पारधी यांच्या पश्चात पती सतीश पारधी व दोन अपत्य — मुलगी कु. सुहानी पारधी (वय १०) व मुलगा नैतिक पारधी (वय १२) असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण पारधी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तळेगांव (ठाकूर) परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांचा अंत्यविधी आज तळेगांव (ठाकूर) येथील हिंदू स्मशानभूमीत पार पडला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे