आर्थिक विवंचनेतून आत्महत्येचे टोकाचे पाऊल  *मोझरीतील श्रीकृष्ण प्रधान यांची दुर्दैवी आत्महत्या

  1. आर्थिक विवंचनेतून आत्महत्येचे टोकाचे पाऊल 
    *मोझरीतील श्रीकृष्ण प्रधान यांची दुर्दैवी आत्महत्या

Mb News-तिवसा तालुका प्रतिनिधी,, (सुनिल घोरमाडे) –मोझरी (ता. तिवसा) येथे आर्थिक अडचणी व वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या एका ५४ वर्षीय पुरुषाने आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. श्रीकृष्ण सुखदेव प्रधान (वय ५४) यांनी दिनांक ४ जून रोजी मध्यरात्री १ वाजता सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले.

श्रीकृष्ण प्रधान यांचा घरगुती वापरातील फळे बांधण्याचा व मूलमजुरीवर आधारित व्यवसाय होता. मात्र, मिळकतीपेक्षा अधिक वाढलेला खर्च, कामधंद्यातील अनिश्चितता आणि आर्थिक ताणतणाव यामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होते. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या मानसिक तणावातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
त्यांच्या पश्चात प्रशांत (वय ३२), मनोज (वय २६) अशी दोन मुले, तसेच दोन विवाहित मुली असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची नोंद स्थानिक पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून पुढील तपास सुरू आहे. आर्थिक विवंचना व सामाजिक असुरक्षिततेचा परिणाम सामान्य जनतेवर किती भयावह पद्धतीने होत आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे