परणकर अभियांत्रिकी महाविद्यालयास चांगल्या श्रेणीत नॅकचे नामांकन प्राप्त.

परणकर अभियांत्रिकी महाविद्यालयास चांगल्या श्रेणीत नॅकचे नामांकन प्राप्त.

MB NEWS (आर्वी)- श्री साई परणकर संस्था आर्वी द्वारा संचालित, आर व्हि परणकर अभियांत्रिकी तथा तंत्रज्ञान महाविद्यालय आर्वीला नुकताच नॅक उत्कृष्ठ श्रेणीसह अक्क्रिडिटेश मिळाले आहे. त्यांना हा दर्जा राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) बँगलोर, यांच्या द्वारा त्यांच्या भेटीनंतर मिळाला आहे. ही संस्था राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयांनी/विद्यापीठांनी केलेल्या कार्याच्या आधारावर त्यांचे मूल्यांकन करून ठराविक निकषांच्या आधारावर त्यांना नॅक अक्क्रिडिटेश हा दर्जा प्रधान करते.
परणकर अभियांत्रिकी महाविद्यालयानि हा दर्जा अवघ्या सात वर्षाच्या अल्पावधीत त्यांचे व्यवस्थापन, उत्कृष्ट कार्य, आणि कठीण परिश्रमाच्या जोरावर प्राप्त केले आहे. या करिता संस्थेचे अध्यक्ष श्री. घनश्याम परणकर आणि सचिव सौ. प्रीतीताई र. परणकर यांनी महाविद्यालयाचे संचालक डॉ. रवींद्र परणकर प्राचार्य डॉ. एन निवासा राव, आयक्यूएसी समन्वयक प्रा. प्रवीण सापाने, नॅक समन्वयक प्रा. निखिल एकोतखाने, प्रशासन अधिकारी प्रा. योगेश पालीवाल विशेष कौतिक केले.
डॉ. परणकर म्हणाले की आम्ही हे कुठल्याही अनुभवाशिवात अवघ्या सात वर्षात त्यांच्या आणि टीमच्या मागील अनेक वर्षांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे प्राप्त करू शकलो आहे, मागील अनेक वर्षापासून संस्था सूचीबद्ध पद्धती कार्य करत आहे. यामध्ये प्रा. महेंद्र गुरुणासीगानी, प्रा. संकेत ठाकरे, प्रा. जिशान शेख, प्रा. प्रणव पांडे, प्रा. मोहित चांडक, प्रा. जयेश गांधी, प्रा. आचल आमले, प्रा. मनिषा बन्नगरे, प्रा. ऋतुजा खोडके, प्रा. अंकिता दिवे, प्रा. स्वाती आखरे, प्रा. निशा बावणे, श्री. निलेश ठाकरे, श्री. मंगेश वडणारे, श्री. साहिल वानखडे, श्री. राजेश वानखेडे, प्राध्यापकवृंद, कर्मचारी सोबतच विद्यार्थ्यांनी सुध्या उत्कृष्ट कार्य केले आहे.
सद्यस्थिती या महाविद्यालय मध्ये संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी आणि यंत्र अभियांत्रिकी या विद्यशाखेत चारवर्षीय अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्कृष्ट सुविधेसह राबविला जातो आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे