Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

राजर्षी शाहू सायन्स कॉलेजमध्ये प्राणीशास्त्र विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा..!

राजर्षी शाहू सायन्स कॉलेजमध्ये प्राणीशास्त्र विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा..!

MB NEWS (चांदुर रेल्वे) :- राजर्षी शाहू सायन्स कॉलेज चांदुर रेल्वे येथील प्राणिशास्त्र विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात आला. या व्याघ्र दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी गटचर्चा आयोजित करण्यात आली. गट चर्चेचा विषय वाघाचे संवर्धन Conservation of Tiger हा होता. या गट चर्चेमध्ये बीएससी भाग दोन व बीएससी भाग तीन च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकाद्वारे प्राणीशास्त्र विभागातील सहयोगी प्रा. डॉ. गजानन संतापे यांनी वाघाच्या संख्या विषयी व संवर्धन विषयी काय उपाययोजना करता येईल वाघ जर असेल तर वने समृद्ध होतील आणि एकूणच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल तर विभाग प्रमुख डॉ.एम. पी. चिखले यांनी वाघाचे अधिवास तसेच वाघाचा संरक्षण करण्याकरिता उपाय योजना व या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी संशोधन याबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी गट चर्चेदरम्यान वाघाचं संवर्धन करण्याकरिता तसेच वाघ वाचविण्याकरिता सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करनार तसेच वन्यजीव वाचविण्याकरिता विविध स्पर्धेमध्ये आपला सहभाग वाढविण्याकरता आम्ही सतत प्रयत्नशील राहू व असेच वन्यजीव संवर्धनाकरिता आम्ही विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवू अशी ग्वाही दिली. सर्वांनी मिळून वाघ तसेच वन्यजीव वाचविण्याची प्रतिज्ञा घेतली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे