मुलगा झाला डॉक्टर… अन मुलगी झाली फार्मासिस्ट….सख्या बहीण -भावाचे नैत्रदीपक यश..
MB NEWS चांदूर रेल्वे (प्रतिनिधी) :-शहरातील प्रतिष्ठीत म्हणून गनल्या जाणाऱ्या ‘ सिमरन टेलर्स’ चे संचालक तथा प्रगतिशील शेतकरी प्रमोद नागमोते यांचा मोठा मुलगा युवराज प्रमोद नागमोते ह्याने आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करीत आयुर्वेद वैद्यकीय शाखेतील बि.ए.एम.एस. ची अंतिम परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्णं केली आहे.एवढेच नव्हे तर संपूर्ण महाविद्यालयातून ‘टॉप फाईव्ह’ मध्ये सुद्धा येण्याचा विक्रम केला आहे. युवराज हा बालपणापासूनच गुणवंत विद्यार्थी होता,त्याने शहरातील नामांकित मानल्या जाणाऱ्या जिंगल बेल इंग्लिश स्कुल मधून दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले ,पुढे NEET परीक्षेची तयारी केली त्यात उत्तम गुण प्राप्त करून नागपूर शहरातील श्री. आयुर्वेद महाविद्यालय येथे प्रवेश मिळवला, डॉक्टर
व आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी युवराज ने अथक परिश्रम घेऊन आयुर्वेद शास्त्रातील पदवी त्याने मिळवली.नुकतिच त्याने एंटरेनशिप पूर्ण केली आहे. महाविद्यालयातर्फे घेण्यात येणाऱ्या पदवी प्रदान समारंभात मान्यवराकडून त्याला पदवी प्रदान करण्यात आली.
युवराज च्या ह्या नैत्रदीपक यशा पाठोपाठ प्रमोद नागमोते यांची लहान कन्या कु.आस्था हिने सुद्धा बि.फार्मसी चे शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण करून अमरावती येथील डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयातून ‘टॉप फाईव्ह’ मध्ये आपले स्थान कायम ठेण्याचा विक्रम नोंदविला आहे. आपल्या दोन्ही मुला मुलीचे
नैत्रदीपक यशाबद्दल वडील प्रमोद नागमोते व आई सौ.भारती नागमोते समाधान व्यक्त करीत आहे. नागमोते यांच्या ह्या दोन्हो मुला मुलींच्या ह्या विक्रमी यशाबाबत सर्वच क्षेत्रातून भावंडावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
–––——————————————
बॉक्स मध्ये..
“आज मी डॉक्टर झालों असलो तरी यात मुख्य वाटा माझ्या आई वडीलांचा आहे. त्यांच्या माझ्या वर असलेला ठाम विश्वास आणि लहान पनापासून माझ्यावर झालेले केलेले संस्कार याची ही फलश्रुती आहे.आज गोष्टीचा मला फार आनंद आहे. माझ्या शैक्षणिक प्रवासात मला लाभलेले अतुल उज्जैनकर सरांचे मार्गदर्शन यांना सुद्धा हे माझ्या यशाचे श्रेय जाते.”
– डॉ.युवराज प्रमोद नागमोते
“माझ्या यशाचे श्रेय खरे मानकरी माझे आई वडील आहे. कारण माझ्या प्रत्येक संघर्षात माझ्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहिले. त्यांचे त्याग, समर्पण, पाठिंबा आणि निरपेक्ष प्रेम मुळेच मी हे यश साध्य करू शकले. माझे माझे शिक्षक मनोज महाजन सर यांच्याही आशीर्वादांचे आणि मार्गदर्शांचे प्रतीक आहे

