Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त मिरवणुकीचे चांदूर रेल्वे शहर कांग्रेस वतीने स्वागत!आणि अल्पोहाराची व्यवस्था.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त मिरवणुकीचे चांदूर रेल्वे शहर कांग्रेस वतीने स्वागत!आणि अल्पोहाराची व्यवस्था.

MB NEWS चांदुर रेल्वे (प्रतिनिधी) -चांदूर रेल्वे, अमरावती: साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त चांदूर रेल्वे येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीत मा. आमदार विरेंद्र भाऊ जगताप आणि शहर कॉंग्रेस कमिटीने उत्साहाने सहभाग घेतला तसेच सर्व सहभागींचे स्वागत केले. अण्णा भाऊ साठे यांच्या सामाजिक परिवर्तन, दलित साहित्य आणि लोककला यांतील योगदानाला उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मिरवणुकीत सहभागी नागरिकांसाठी अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली. मा. आमदार विरेंद्र भाऊ जगताप यांनी आपल्या भाषणात अण्णा भाऊंच्या समतावादी विचारांचे आणि साहित्याचे महत्त्व अधोरेखित करत, सामाजिक न्याय आणि उपेक्षित वर्गाच्या उत्थानासाठी त्यांच्या कार्याला प्रेरणा मानण्याचा संकल्प व्यक्त केला.या सार्वजनिक मिरवणुकीत सामाजिक संस्था, साहित्यप्रेमी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी अमोलभाऊ होले तालुकाध्यक्ष,श्रीनिवास सूर्यवंशी शहराध्यक्ष,प्रभाकर वाघ,परीक्षित जगताप, हर्षल वाघ देवानंद खुणे,प्रफुल्ल कोकाटे,राजू लांजेवार,रुपेश पुडके,भीमराव पवार,पंकज मेश्राम,सक्षम वानखडे,रितेश शेळके,सारंग देशमुख,सुमेध सरदार,वैभव मलावर,गजू चोरे,सतपाल वरठे,अजय होटे,संकेत जगताप,शरद घासले,सागर भेंडे,वेदांत श्रीखंडे,मनोज गोलाईत,अतुल मकेश्वर,नरेंद्र मेश्राम,रविकांत भोमकाळे,सतीश देशमुख,अनंत पोलाड,इम्रान सौदागर,दिनेश वाघाडे. भरत कसे, आकाश इंगळे,विशेष परिश्रम घेतले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे