Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

भारतीय जनता पार्टी विद्यापीठ मंडळामध्ये आयोजित तिरंगा पदयात्रा उत्साहात संपन्न झाली.

भारतीय जनता पार्टी विद्यापीठ मंडळामध्ये आयोजित तिरंगा पदयात्रा उत्साहात संपन्न झाली.

MB NEWS (अमरावती)- भारतीय जनता पार्टी विद्यापीठ मंडळामध्ये आयोजित तिरंगा पदयात्रा उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाला भाजपा अमरावती शहर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ.नितीन जी धांडे , अमरावती एमआयडीसीचे अध्यक्ष श्री.किरण भाऊ पातुरकर , भाजपा प्रदेश सचिव सिद्धार्थ जी वानखेडे , भाजयुमोचे प्रदेश महामंत्री श्री. बादल दादा कुळकर्णी , श्री.ललित जी समदुरकर, श्री.राजुभैया कुरिल , अमरावती मनपाच्या माजी उपमहापौर सौ.संध्याताई टिकले , भाजपा विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रफुल्ल जी बोके , तिरंगा पदयात्राचे संयोजक श्री.दीपक जी गिरोलकर , सोबतच भारतीय जनता पार्टी विद्यापीठ मंडळामधील सर्व कार्यकारिणी आणि महिला मोर्चा , युवा मोर्चा , ओबीसी मोर्चा , एसी मोर्चा , एस टी मोर्चा , आध्यात्मिक आघाडी मधील सर्व आत्मीय बंधू भगिनी उपस्थित होते.

तिरंगा पदयात्रा श्री.दीपक गिरोलकर यांच्या यशोदा नगर येथील कार्यालयापासून सुरू होऊन न्यू कॉलनी मधील श्री.गजानन महाराज मंदिराजवळ समाप्त झाली. कार्यक्रमाला जवळपास १५० च्या संख्येमध्ये नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.दीपक गिरोलकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे