इंजि. अक्षय अथोटे यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी निवड.

इंजि. अक्षय अथोटे यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी निवड.

MB NEWS(प्रतिनिधी )चिखलदरा:- युवा ग्रामीण पत्रकार संघाने अमरावती जिल्हा युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी इंजि. अक्षय अथोटे यांची निवड केली आहे. त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. इंजि अक्षय अथोटे यांनी निवडल्याबद्दल संघटनेचे आभार मानत ग्रामीण पत्रकारितेच्या विकासासाठी आणि युवा पत्रकारांच्या हितासाठी निष्ठेने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

इंजि. अक्षय अथोटे यांनी ग्रामीण भागातील पत्रकारितेला बळकटी देण्यासाठी आणि युवा पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील युवा पत्रकारांना नवीन संधी मिळण्याची आणि ग्रामीण समस्यांना वाचा फोडण्याची अपेक्षा आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघ ग्रामीण पत्रकारांचे हक्क आणि कौशल्यवृद्धीसाठी कार्यरत आहे. अथोटे यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील युवा आघाडी नवीन उंची गाठेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सर्व स्तरांतून त्यांना शुभेच्छा मिळत आहेत.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे