Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

. रोहित पटेल (माजी सभापती, पं.स. धारणी ) यांचा मार्फत धारणी शहरातील खालील नमुद शाळांमध्ये इयत्ता ६ वी इ.१२ वी च्या मुलींकरीता मोफत आत्मसरंक्षण शिबिर आयोजीत

मा. रोहित पटेल (माजी सभापती, पं.स. धारणी ) यांचा मार्फत धारणी शहरातील खालील नमुद शाळांमध्ये इयत्ता ६ वी इ.१२ वी च्या मुलींकरीता मोफत आत्मसरंक्षण शिबिर आयोजीत
अक्षय अथोटे मेळघाट चिखलदरा MB-NEWS प्रतिनिधी

 

MB-NEWS (धारणी) :-अमरावती जिल्हा तील धारणी तालुक्यांत धारणी शहरातील विविध शाळांमध्ये शाळकरी मुलींकरीता (इयत्ता ६ वी ते १२ वी ) मोफत आत्मसंरक्षण शिबिर आयोजन करीत असल्याबाबत. प्रशिक्षण उपरोक्त विषयान्वये धारणी शहरातील विविध शाळांमध्ये अनेक मुली शिक्षण घेत असून त्यांना स्वतःचे आत्मसंरक्षण करता यावे म्हणून श्री. रोहित पटेल (माजी सभापती, पं.स. धारणी ) यांचा मार्फत धारणी शहरातील खालील नमुद शाळांमध्ये इयत्ता ६ वी इ.१२ वी च्या मुलींकरीता मोफत आत्मसरंक्षण शिबिर आयोजीत करण्याचे ठरविण्यात आले आहे. शिबिरामध्ये मुलींना कराटे, बॉक्सींग, तायकांडो व लाठी चालविणे शिकविण्यात येईल. जेणेकरून मुलींना आत्मसंरक्षण करण्यात मदत मिळेल व मुली आत्मनिर्भर होतील. सदर आत्मसरंक्षण शिबिराकरीता खालील प्रमाणे प्रशिक्षक द्वारे प्रशिक्षण देण्यात येईल.

१) श्री. रूपेश तायडे (ब्लॅक बेल्ट सेकेंड डॉग तथा सेक्रेटरी अमरावती कराटे असोसीएशन)
२) कु. स्वेता सोनी (ब्राऊन बेल्ट तथा स्टेट बेस फाईटर) ३) कु. ईश्वरी खंडारे (ग्रीन बेल्ट तथा राज्य स्तरीय गोल्ड मेडलीस्ट कराटे) ४) कु.खुशी खंडारे (ग्रीन बेल्ट कराटे) खालील प्रमाणे शाळेत आत्मसंरक्षण शिबिर घेण्याचे ठरले आहे.
शाळेचे नाव
(१) जिल्हा परिषद हायस्कुल धारणी
दि. २७/०९/२०२२ ते दि. ३१/०९/२०२२,
(२) कस्तुरबा गांधी विद्यालय धारणी
दि. २७/०९/२०२२ ते दि. ३१/०९/२०२२,
(३) जिल्हा परिषद कन्या शाळा धारणी
दि. ०४/१०/२०२२ ते दि.०८/१०/२०२२,
(४) जिल्हा परिषद उर्दु शाळा धारणी
दि. ०४/१०/२०२२ ते दि. ०८/१०/२०२२,
(५) ज्ञानमंदिर कन्या शाळा धारणी
दि. ११/१०/२०२२ ते दि. १५/१०/२०२२,
(६) श्री. व्ही. एन. कॉलेज धारणी
शिबीराचे दिनांक
दि. ११/१०/२०२२ ते दि. १५/१०/२०२२,
——————————————————

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे