Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

गुरुकुंज मोझरी गुरुदेवनगरात राष्ट्रीय महामार्गालगत अतिक्रमणाचा विळखा.

गुरुकुंज मोझरी येथील गुरुदेव नगरात राष्ट्रीय महामार्गालगत अतिक्रमणाचा विळखा.

MB-NEWS गुरुकुंज मोझरी (आशिष देशमुख,प्रतिनिधी):-राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गुरुदेवनगरातील अतिक्रमणामुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत काही दिवसांपूर्वी एक भरधाव ट्रक थेट किराणा दुकानात शिरल्याने या अपघातामध्ये एका विद्यार्थीचा मुत्यु झाला सदरचे अतिक्रमण तत्काळ हटवावे व तेथे गतिरोधक बसवावे अशी मागणी गावकरी करीत आहे अन्थथा रास्ता रोको आदोलन करण्याचा इशारा देखील देण्यांत आला .याबाबतचे निवेदन आ.यशोमती ठाकुर,जिल्हाधिकारी,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग,पोलीस स्टेशन, तिवसा गामपंचायत,गुरुदेवनगर यांना सादर केले आहे.राष्ट्रसंत तुकोडोजी महाराज महासमाधी परिसर ते गामपंचायत कार्यालय राष्ट्रीय महामार्गावरील हे ठिकाण सध्या अपघाताचे प्रणवस्थळ झाले आहे येथे पादचारी रस्ताच नाही तर महामार्गालगत व्यावसासिक प्रतिष्ठाने आहेत तसेच याच मार्गवर आयुर्वेद रुग्णालय व शाळा महाविद्यालय असल्यामुळें शालेय विद्यार्थीसह नागरिकांची नेहमीच वर्दर असते येत्या 8 ते 16 आक्टोंबर दरम्यान राष्ट्रसंत तुकोडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव असुन लाखो गुरुदेवभक्त यावेळी गुरुकुंजात दाखल होतात अशावेळी भरधाव येणाऱ्या वाहनांपासुन नागरिकांना जीव मुठीत धरुन चालावे लागते .त्यामुळे महामार्गवर व्यावसाय थाटलेल्या व्यावसासिकांना पार्किंगचे अजिबात भान नाही भविष्यात येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे महामार्गावर असलेल्या व्यापारी संकुलाची जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हस्तातरीत केली असुन संबधितांना त्याच्या मोबदलासुध्दा देण्यात आला आहे परतु व्यावसायिक त्याच जागेवर ठाण मांडुन बसल्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग व प्रशासनाने याबाबत एका आठवडय़ात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणधारकावर कार्यवाही न केल्यास राष्ट्रीय महामार्गावर रारता रोको आदोलन करण्याचा इशारा गुरुदेवनगरवासीयांनी दिला आहे या शिष्टमंडळात पंकज देशमुख .अनिल डीक्कर.अनिल कायदे.अमोल चिगलकर आदीचा समावेश होता .

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे