कित्येक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या मागणीला अखेर ग्रामस्थांना आले यश.कर्तव्यदक्ष लोकप्रिय आ. प्रतापदादा अडसड यांनी घेतली दखल.रस्ता दुरूस्तीकरण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंतांना दिले त्वरित निर्देश.
MB-NEWS (मंगेश बोबडे ):-धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघातील अंजनगाव बारी- टिमटाला- अडगाव बु.- मांजरी-म्हसला-सातरगाव -कंझरा-धानोरा मोगल -टोंगलाबाद-राजुरा-बोरी -किरजवळा-सुलतानपूर या प्र. जी.मा.शासन सांकेतिक क्रमांक -31 व मोरगाव -लोणी -जनुना -टिमटाळा-खिरसाना-निरसाना-सावनेर -मोखड -नांदगाव खंडेश्वर या प्र.जी.मा.शासन सांकेतिक क्रमांक -78 या रोडवर अत्यंत मोठे खड्डे पडल्यामुळे रोडची पार दुर्दशा झाली व दयनीय अवस्था झाली होती ग्रामस्थांना फार त्रास होत होता. त्यामुळे सातरगाव येथील शेतकरी व भाजपा चे पदाधिकारी श्री.मनीषजी जाधव पाटील यांनी याची तात्काळ दखल घेत सुमारे तीन महिन्यापूर्वी अमरावती विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीत धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे तरूण,तडफदार,अभ्यासू व कर्तव्यदक्ष आमदार श्री.प्रतापदादा अडसड यांना निवेदन दिले होते. तेव्हा त्यांनी मिटींग मध्येच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग याना तात्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. परंतु यादरम्यान सतत तीन महिने एकसारखा पाऊस असल्यामुळे कंत्राटदाराला कारण सापडले व त्यांनी काम सुरु केले नाही. पण सातरगाव येथील मनीषभाऊ जाधव पाटील यांचा आमदार प्रतापदादा कडे प्रामाणिक सातत्याने पाठपुरावा सुरूच होता. शेवटी प्रामाणिक प्रयत्नाला अखेर यश आले. व आमदार प्रतापदादा यांनी सुद्धा पाऊस उघडताच संबंधित यंत्रणेला तात्काळ कारपेट- सिलीकॉट -एमपीएम योग्य पध्दतीने खड्डे बुजवण्याचे निर्देश देण्यात आले.
तर दुसरीकडे टिमटाळा येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी वारंवार टिमटाला रपट्यावर मंजूरात असूनही प्रलंबित असणा-या पुलबांधणी अभावी होत असलेल्या अपघाताची व जनुना सावनेर नादुरुस्त रस्ता डांबरीकरणाअभावी जनसामान्यांना होत असलेला त्रास निवेदनाद्वारे तसेच विविध वर्तमानपत्र व न्युज चॅनल द्वारे जनप्रतिनिधि व संबंधित अधिका-यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. नुकतेच टिमटाळा येथील चिमुकल्यांनी रपट्याची श्रमदानातून डागडुजी करून मार्गक्रमण करणा-या ग्रामस्थांचा त्रास काही प्रमाणात कमी केला होता. मा.आमदार प्रतापदादा अडसड यांनी शमनीषभाऊ जाधव पाटील यांना दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी उपकार्यकारी अभियंता व शाखा अभियंता यांच्यासोबत कामाची योग्यता तपासण्याकरिता तात्काळ पाहणी दौरा करण्याचे आदेश दिले. या अनुषंगाने मनीषभाऊ जाधव पाटील व विशालभाऊ मेश्राम यांच्या अधिपत्याखाली शासकीय अधिकारी यांच्यासोबतच पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे,भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग काकडे, ऋषिकेश ढेपे,स्विय सहाययक योगेशभाऊ परिमल, खिरसाना ग्रामचे पोलीस पाटील राजेंद्रजी राठोड, दिलीपभाऊ वानखडे, प्रफ्फुल सोमकुवर,वैभव वैश्य,प्रतिक वैश्य, वऱ्हाडे बंधू,राजू वडणेरकर, गजानन काकडे,सोबतच इतरही ग्रामस्थ उपस्थित होते.
टिमटाळा येथील रपट्याची पाहणी करतांना पुलबांधकामाची स्थिती व चिमुकल्यांनी केलेली डागडुजी श्रीपाल सहारे यांनी उपस्थित अधिका-यांच्या लक्षात आणून दिली. या पाहणी दौ-यादरम्यान मा.आमदार अरूणभाऊ अडसड यांनी भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या. श्रीपाल सहारे यांनी चर्चेदरम्यान रस्ता दुरूस्तीकरण व पुलबांधणी संदर्भातील मुद्दा उपस्थित केला असता अडसड साहेबांनी तात्काळ संबंधित अधिकारी यांना कामे पूर्ण करण्याचे निर्देशही दिले.

