आझाद नवदुर्गा मंडळाने दिले सभागृह आणि सौंदर्यीकरणा बाबत आमदारांना दिले निवेदन..
MB NEWS चांदूर रेल्वे :-शहरातील ४० वर्ष अधिक नवदुर्गा उत्सवाची परंपरा कायम राखत तालुक्यात नावलौकिक प्राप्त केलेले आझाद नवदुर्गा मंडळ दरवर्षी नवदुर्गा उत्सवा दरम्यान दरवर्षी अनेक समाजिक व लोकभिमुख उपक्रम राबवीत असते. नुकतेच शहरातील विश्राम गृहात आज धामणगाव मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रताप अडसड यांनी जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार भरवीला असता ह्या संधीचा लाभ घेत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडळाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक हर्षल वाघ यांच्या नैतृत्वात मंडळाच्या खुल्या मैदानावर सभागृह बांधणे बाबत तसेच परिसराच्या सौंदर्यीकरना बाबत आमदार प्रताप अडसड यांना निवेदन दिले ग यावेळी नगरसेवक हर्षल वाघ याचेसह राजू कलावटे , पिंटू पतरिया, संतोष खानझोडे, निलेश टाके, रोहित बागडे , सागर गोटले, बबलू वैद्य हे सदस्य उपस्थित होते. निवेदन दिले असता आमदार प्रताप अडसड यांनी संपूर्ण काम लवकरच पूर्ण करून देण्याचे आश्वासन सुध्दा मंडळाच्या सदस्यांना दिले.

