Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपीत ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचे आयोजन

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपीत ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचे आयोजन

MB NEWS (अमरावती) :- द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर माताखिडकी अमरावती येथे श्रीकृष्ण महिला मंडळाचे वतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपीत ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक. 6 मार्च 2026 ते शुक्रवार दि. 13 मार्च 2026 पर्यंत करण्यात आले आहे.

. प्रवचनाची वेळ दररोज सायंकाळी 6-30 ते 8 वाजेपरेंत राहिल
घोटी. जी.नाशीक निवासी ब्रह्मविद्या विभूषित वयोवृद्ध, तपोवृद्ध प.पु.प.महंत, पुजदेकर बाबा महानुभाव, यांच्या सुमधुर वाणीतून निरूपण आयोजित करण्यात आले आहे. प. पु. पुजदेकर बाबा हे ब्रह्मविद्या शास्त्राचे अभ्यासक असून संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी त्यांची सतत प्रवचने होत असतात.

. या प्रवचन सोहळ्याचे उद्घाटन शुक्रवारी दि. 6 मार्च रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता अखिल भारतीय महानुभाव परीषदेचे अध्यक्ष तथा महानुभाव आश्रम राजापेठ अमरावती चे संचालक कवीश्वर कुळाचार्य आचार्य प्रवर प.पु.प.महंत मोहनराज बाबा कारंजेकर यांचे शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री सुभाष पावडे, उपाध्यक्ष डॉ. अशोक राऊत तसेच सचिव ॲड अरुण ठाकरे, कोषाध्यक्ष इंजि. एस. पी. देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होईल या सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम शुक्रवारी दि. 13 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता, घेण्याचे ठरले आहे. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष, प. पू. प. म. आचार्यप्रवर श्री दर्यापुरकर बाबा, बडनेरा आश्रम, तसेच रिद्धपूर निवासी महंत गोपीराज बाबा शास्त्री नवे महानुभाव हे असणार आहे. या प्रवचन सोहळ्याकरिता सर्व सद्भक्तांनी वेळेवर उपस्थित राहून ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अमरावती श्रीकृष्ण महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट अमरावती चे वतीने करण्यात येत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे