Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

महिला दिनानिमित्त पु.संत गाडगेबाबा विद्यालयात माता-पालक मेळावा उत्साहात,महिलांचा सन्मान, मार्गदर्शन व भेटवस्तू वितरणाने कार्यक्रम संपन्न.

महिला दिनानिमित्त पु.संत गाडगेबाबा विद्यालयात माता-पालक मेळावा उत्साहात,महिलांचा सन्मान, मार्गदर्शन व भेटवस्तू वितरणाने कार्यक्रम संपन्न.

MB NEWS (चांदुर रेल्वे ) -मांजरखेड(कसबा) ता. चांदुर रेल्वे. दि. 14 /3/ 2026. जागतिक महिला दिनानिमित्त पु.संत गाडगेबाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मांजरखेड (कसबा )येथे माता-पालक मेळाव्याचे भव्य व उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला गावातील माता-पालक, शिक्षिका तसेच मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थाप्रमुख प्रा.बी.आय. इंगळे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. सुभाषजी सहारे (केंद्रप्रमुख) मांजरखेड (कसबा) यांच्या हस्ते करण्यात आले .प्रमुख अतिथी म्हणून चांदुररेल्वे येथील नवनिर्वाचित महिला नगराध्यकक्षा प्रा.प्रियंका निलेश विश्वकर्मा , प्रमुख वक्त्या व अतिथी म्हणून प्रा.निवेदिताताई वाघ संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ.साधनाताई इंगळे तसेच मांजरखेडच्या सरपंच सौ.पल्लवीताई देशमुख , तसेच सौ.भावनाताई ढगे व चांदुररेल्वे येथील माजी नगरसेवक श्री.रवीभाऊ दीक्षित यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री यु.आर.ढगे यांनी केले. त्यांनी महिला दिनाचे महत्त्व, समाजातील महिलांचे स्थान, तसेच विद्यार्थ्यांच्या घडणीत आईची भूमिका किती महत्त्वाची आहे यावर मार्गदर्शन केले.तसेच श्री.सुभाषजी सहारे उद्घाटक यांनी आपल्या भाषणातून ग्रामीण भागातील महिलांचा सहभाग विद्यार्थ्यांच्या जडणघडणी करिता किती महत्त्वाचा आहे. याबद्दल सांगितले.यावेळी प्रमुख वक्त्या प्रा.निवेदिता वाघ यांनी आपल्या भाषणातून महिलांचे शिक्षण,आत्मविश्वास व सशक्तीकरण यावर भर दिला व महिला घर तसेच नोकरी सांभाळून मुलांच्या पालन पोषण कशा पद्धतीने करतात याबद्दल माहिती दिली. नगराध्यक्षा डॉ. प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी महिलांनी शिक्षण व सामाजिक कार्यात पुढे येण्याचे आवाहन केले, वर्ग 11वी( विज्ञान )ची विद्यार्थिनी कु.यशस्वी भिल हिने आपल्या भाषणामध्ये सांगितले की,ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या कोण कोणत्या आहेत व त्या कशा पद्धतीने त्यावर मात करता येतात याबद्दल माहिती दिली. शाळेतील शिक्षिका सौ.खडसे यांनी आपल्या भाषणामध्ये देशातील मोठमोठ्या स्त्रियांनी आपले कर्तृत्व कसे सिद्ध केले याबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.बी.आय.इंगळे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सर्वांनी स्त्रियांचा सन्मान करावा .कारण स्त्रियाच मुलांच्या शिक्षक व माता असून मुलांवर संस्कार करण्याचे काम त्या करत असतात असे म्हटले.

त्यानंतर शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचा व शिक्षकेत्तर महिलांचा शाल व श्रीफळ तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला .सोबतच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या माता पालकांना सुद्धा भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणित शिक्षक श्री.हेमंत यावले यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले. तसेच आभार प्रदर्शन प्रा.निलेश मडघे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व कार्यरत शिक्षक त्यामध्ये पर्यवेक्षक श्री.सरदार,प्रा.धोटे,प्रा.शिरपूरकर, प्रा.पठाण,डॉ.प्रा राऊत,श्री.बोरकर ,श्री सूर्यवंशी, श्री.यावले श्री. माळोदे,श्री.काळे ,सौ. इंगळे, सौ. गोहत्रे,प्रा.वर्षा इंगळे,प्रा.डोंगरे ,प्रा.भांडे,प्रा.डॉ.रोटे,प्रा.बेलसरे, प्रा.महाजन,प्रा.मनवर, श्री.समीर देशमुख शिक्षकेतर कर्मचारी श्री.रावसाहेब वानखडे,श्री,मनोहरे,श्री.प्रफुल कोराटे,श्री.अक्षय पळसपगार, श्री.वसंतराव नेवारे,श्री.शिवदास ढोके,सौ. सविता गवई, सौ प्रतिभा शेंडे, स्कूल बसचालक शेखर भाऊ ब्राह्मणकर व तसेच लेक्सीकोन इंग्लिश शाळेतील मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा देशमुख, सौ. सवाई, सौ.स्थूल, सौ.जाधव, सौ. ढोके तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित असून या सर्वांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भरपूर योगदान मिळाले.कार्यक्रमाचा शेवटसर्वांना अल्पोपहार देऊन करण्यात आला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे