Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

चांदूर रेल्वे तालुक्यात  कवठा कडू  मध्ये करंट लागून गाईचा मृत्यू; विद्युत वितरण कंपनीवर शेतकऱ्याचा आरोप

चांदूर रेल्वे तालुक्यात  कवठा कडू  मध्ये करंट लागून गाईचा मृत्यू; विद्युत वितरण कंपनीवर शेतकऱ्याचा आरोप

MB NEWS ( महाराष्ट्रातील बातमीपत्र ) –चांदूर रेल्वे तालुक्यातील कवठा कडू या ग्रामीण भागात करंट लागून एका गाईचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी निलेश लोमटे यांच्या मालकीची गाय शेत परिसरात असताना विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिला करंट लागला. या घटनेत गाईचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारामुळे लोमटे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या संदर्भात निलेश लोमटे यांनी विद्युत वितरण कंपनीवर गंभीर आरोप करत भोंगळ कारभारामुळे ही घटना घडल्याचे सांगितले. “विद्युत ऊर्जा तारेच्या निष्काळजीपणामुळे माझ्या गाईचा मृत्यू झाला,” असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी विद्युत वितरण व्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले असून संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, तसेच नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे