Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अलका करणवाल यांची अहिल्याबाई होळकर राज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराकरिता निवड,शहरातील मुंधडा महाविद्यालयात क्रिडा विभागप्रमुख पदाची पार पाडत आहे जबाबदारी

अलका करणवाल यांची अहिल्याबाई होळकर राज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराकरिता निवड,शहरातील मुंधडा महाविद्यालयात क्रिडा विभागप्रमुख पदाची पार पाडत आहे जबाबदारी

MB-NEWS चांदूर रेल्वे – (मंगेश बोबडे )                     पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार – २०२२ करिता चांदूर रेल्वे शहरातील स्व. मदनगोपाल मुंधडा महाविद्यालयातील शारिरिक शिक्षण व क्रिडा विभाग प्रमुख असलेल्या अलका करणवाल यांची निवड करण्यात आली आहे.

कै. सौ. चंद्रभागाबाई भिका कंखरे बहुद्देशिय संस्था, शिरपूर महाले प्रतिष्ठान, धुळे या संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शिक्षिकांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार – २०२२ देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी एका जिल्ह्यातून एक महिला शिक्षिकेची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यामधून चांदूर रेल्वे शहरातील स्व. मदनगोपाल मुंधडा महाविद्यालयातील शारिरिक शिक्षण व क्रिडा विभाग प्रमुख अलका करणवाल यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पुरस्काराचे वितरण श्रीमंत भुषणसिंह राजे होळकर (इंदौर) यांचे शुभहस्ते ९ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११.३० वाजता धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे होणार आहे .

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे