Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

MB NEWS (अमरावती) :-गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक सजावट, सामाजिक प्रबोधन आणि सर्जनशीलतेला चालना मिळावी, या उद्देशाने पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप, अमरावती तर्फे दरवर्षी प्रमाणे ‘भव्य गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, व्यावसायिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणेशोत्सव अशा तीन विभागांत ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेची अधिकृत घोषणा व नियमावलीचे विमोचन ग्रुपचे उपाध्यक्ष श्रेयशदादा पोटे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांनी व नागरिकांनी पर्यावरणपूरक तसेच सामाजिक संदेश देणारी सजावट करणे अपेक्षित आहे. सजावटीचे फोटो व व्हिडीओ आयोजकांकडे सादर करण्यासाठी www.prpotepatilengg.ac.in या संकेतस्थळावर जाऊन ‘गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ या आयकॉनवर क्लिक करून गुगल फॉर्मद्वारे माहिती भरावी लागणार आहे.

स्पर्धेचा कालावधी १४ ते २५ सप्टेंबर २०२६ असा आहे. या कालावधीतच स्पर्धकांनी आपल्या गणेशोत्सव सजावटीचे फोटो व व्हिडीओ पाठवायचे आहेत.
२६ सप्टेंबरनंतर प्राप्त होणारे साहित्य स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विभागात प्रथम क्रमांकासाठी ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ९ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय सहभागी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे.

व्यावसायिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांकास ३१००/- रुपये, द्वितीय क्रमांकास २१००/- रुपये आणि तृतीय क्रमांकास ११००/-रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेत २१ रोख बक्षिसे व मानचिन्हे देण्यात येणार असून, सहभागी सर्व स्पर्धकांना आयोजकांच्या वतीने ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवातील सजावटीच्या माध्यमातून सामाजिक संदेश आणि पर्यावरण संवर्धनाची भावना अधिक व्यापक व्हावी, यासाठी आयोजित या स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, व्यावसायिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे