Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

पी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मान

पी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मान

MB NEWS (अमरावती) :-पी .आर. पोटे पाटील अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या आयईआय विद्यार्थी प्रकोष्ठास (IEI Student Chapter – 444602/PCEM/ET) ‘Best IEI Student Chapter Award’ प्राप्त झाला. तसेच संपूर्ण विदर्भ विभागात प्रथम Life Time Institutional Membership प्राप्त करणारे महाविद्यालय म्हणून पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाचा विशेष सत्कार करण्यात आला.

अभियंता दिनानिमित्त दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), अमरावती लोकल सेंटरच्या वतीने अभियंता भवन, शेगाव नाका, अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार व सन्मान प्रदान करण्यात आला.

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या आयईआय विद्यार्थी प्रकोष्ठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या तांत्रिक व व्यावसायिक विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये तांत्रिक कार्यशाळा, तज्ज्ञ व्याख्याने, औद्योगिक भेटी, प्रकल्प स्पर्धा, कौशल्यविकास प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि विविध विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची व्यावहारिक ओळख करून देणे आणि त्यांच्यामध्ये तांत्रिक कौशल्ये, समस्या सोडविण्याची क्षमता व नाविन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित करणे हा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे.

Best IEI Student Chapter Award हा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील आयईआय विद्यार्थी प्रकोष्ठाच्या सातत्यपूर्ण तांत्रिक उपक्रमांची, विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाची आणि प्राध्यापकांच्या समन्वयात्मक कार्याची दखल घेणारा महत्त्वपूर्ण सन्मान ठरला आहे. तसेच संपूर्ण विदर्भ विभागात प्रथम Life Time Institutional Membership प्राप्त करणारे महाविद्यालय म्हणून झालेला सन्मान हा संस्थेसाठी विशेष अभिमानाचा क्षण ठरला.

या यशामागे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन व पाठबळ लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांसाठी विविध व्यावसायिक व तांत्रिक संस्थांशी संबंधित उपक्रम प्रभावीपणे राबविण्यास चालना मिळाली.

महाविद्यालयाचे संचालक डॉ. पी. एम. खोडके, प्राचार्य डॉ. पी. एम. जावंधिया, उपप्राचार्य डॉ. मोहम्मद झुहैर, अधिष्ठाता विद्यार्थी कल्याण डॉ. एस. के. नंदा आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. यू. डब्ल्यू. होरे यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे हा गौरव प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

आयईआय विद्यार्थी प्रकोष्ठाचे प्राध्यापक सल्लागार प्रा. एस. पी. भोंगे, आयईआय विद्यार्थी प्रकोष्ठाचे अध्यक्ष पियुष खांगर, उपाध्यक्ष रक्षा चव्हाण, सचिव पूर्वा टेकाडे तसेच विभागातील सर्व प्राध्यापक, आयईआय समन्वयक आणि विद्यार्थी सदस्यांनी पुरस्कारासाठी विशेष योगदान दिले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आयईआय विद्यार्थी प्रकोष्ठाचे अभिनंदन करण्यात आले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे