Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

एकात्मिक बाल विकास नवीन नागरी प्रकल्प चांदुर रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण अभियान निमित्ताने चांदुर रेल्वे येथील अंगणवाडी कडून विविध उपक्रम व स्पर्धाचे आयोजन करून पोषण आहाराविषयी जनजागृती करण्यात आली.

एकात्मिक बाल विकास नवीन नागरी प्रकल्प चांदुर रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण अभियान निमित्ताने चांदुर रेल्वे येथील अंगणवाडी कडून विविध उपक्रम व स्पर्धाचे आयोजन करून पोषण आहाराविषयी जनजागृती करण्यात आली.

(MB-NEWS)चांदुर रेल्वे :-दरवर्षी केंद्र व महाराष्ट्र शासनाच्यावतीने सप्टेंबर महिना हा जागतिक पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. आज ही आपल्या देशात योग्य पोषण आहार न मिळल्यामुळे गरोदर माता, लहान मुले, किशोरवयीन मुली यांचा योग्य विकास होत नाही. सही पोषण, देश रोशन या म्हणीप्रमाणे योग्य पोषण मिळणे आवश्यक आहे.

चांदुर रेल्वे शहरातील सर्व अंगणवाडीच्या वतीने कार्यक्रमाची सुरुवात 30 सप्टेंबर रोजी सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण माजी सभापती कल्पना लांजेवार या उपस्थित होत्या तर उदघाटन महिला महाविद्यालयाच्य प्रा. अनिता धुर्वे यांच्या हस्ते झाले.यावेळी माजी नगरसेवक बच्चू वानरे, पत्रकार बंडु आठवले उपस्थित होते.

यावेळी महिला व बालकल्याण माजी सभापती कल्पना लांजेवार यांचेकडून प्रत्येक अंगणवाडी ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देण्यात आली.
एक सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या रेवा भारत वानखडे, शौर्य सतीश वानखडे , समर्थ अर्जापुरे श्रावणी अजय नखाते, आराध्या मारुती धानकोले , आरव सचिन जरे, अतिफा शेख जहीर यांची सुदृढ बालक म्हणून निवड करण्यात आली. तसेच ग्रामीण रुग्णालयात गरोदर माता, किशोरवयीन मुली यांना पोषक आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
.यावेळी अंगणवाडी सेविका अरुणा आठवले , सुनंदा कांडलकर, शारदा तायडे, गुलशन कुरेशी, शारदा राऊत , सीमा बोडके ,धनश्री श्रीराव, जया मोठघरे, शीला नागणे,शीतल तिखे, तर मदतनीस म्हणून वनिता चामलाटे, रजनी शेंद्रे, नंदा नेवारे , अनुसया राऊत , शारदा वानखडे, मंदा घाटोळ सुनिता गिरी, अर्चना ढेपे , उमा सुखदेवे, उपस्थित होत्या
या कार्यक्रमाकरिता सूत्रसंचालन सीमा बोडके प्रास्ताविक धनश्री श्रीराव आभार शितल तिखे यांनी केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे